S M L

Video- टीम इंडियाच्या गोलंदाजांची झाली धुलाई, तरीही आनंदात नाचत होता विराट कोहली

विराट आनंदाने उड्या मारायला लागला. त्याचा हा अंदाज पाहून समालोचकही हसायला लागले.

Updated On: Dec 2, 2018 02:42 PM IST

Video- टीम इंडियाच्या गोलंदाजांची झाली धुलाई, तरीही आनंदात नाचत होता विराट कोहली

सिडनी, ०२ डिसेंबर २०१८- भारत आणि ऑस्ट्रेलिया XI मध्ये खेळण्यात आलेल्या सराव सामना अनिर्णित राहीला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने चौथ्या दिवशी ६ गडींच्या मोबदल्यात ३५६ धावांपासून खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ५४४ धावा करत बाद झाला. हा सराव सामना असल्यामुळे भारताच्या १० खेळाडूंनी गोलदांजी केली. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीनेही गोलंदाजीमध्ये आपलं नशीब आजमावलं.


कोहलीने ७ षटकांमध्ये २७ धावा दिल्या तर १ गडीही बाद केला. त्याने शतकवीर हेनरी नीलसनला बाद केले. विराटच्या गोलंदाजीवर उमेश यादवने नीलसनचा झेल घेतला. उमेशने झेल घेतल्याचे कळताच सुरुवातील विराटला त्याला एक विकेट मिळाली यावर विश्वास बसला नाही. मात्र नंतर तो आनंदाने उड्या मारायला लागला. विराटचा हा अंदाज पाहून समालोचकही हसायला लागले.भारतीय संघाने चौथ्या आणि अंतिम दिवशी खेळ संपेपर्यंत दोन गड्यांच्या बदल्यात २११ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहीला. पहिल्या डावात ३५८ धावसंख्या करणाऱ्या भारतीय संघासाठी मुरली विजयने दुसऱ्या डावात १२९ आणि लोकेश राहुलने ६२ धावा केल्या. विजयने १३२ चेंडूत १६ चौकार आणि ५ शटकार लगावले. हनुमा विहारीने ३२ चेंडूत १५ धावांची नाबाद खेळी खेळली.


Loading...ऑस्ट्रेलिया XI साठी डी फालिंस आणि डार्सी शॉर्ट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलिया XI च्या पहिल्या डावात हॅरी निएल्सनने १००, एरॉन हार्डीने ८६, शॉर्टने ७४, मेक्स ब्रायंटने ६२ आणि डेनियल फालिंगने ४३ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३, आर. अश्विनने २ आणि उमेश यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीने प्रत्येकी १ गडी बाद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 02:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close