S M L

VIDEO: पाहावे ते नवीनच... बॉल फेकण्यासाठी गोलंदाज फिरला ३६० डिग्री

फलंदाजाची वेगळी शैली असू शकते तर गोलंदाजाची का नाही

Updated On: Nov 8, 2018 06:46 PM IST

VIDEO: पाहावे ते नवीनच... बॉल फेकण्यासाठी गोलंदाज फिरला ३६० डिग्री

क्रिकेटच्या मैदानात तुम्ही फलंदाजांना वेगवेगळ्या प्रकारात फलंदाजी करताना पाहीलं आहे. दक्षिण आफ्रीकेचा माजी कर्णधार एबी डीविलियर्स तर त्याच्या फलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे मिस्टर ३६० या नावाने प्रसिद्ध होता. आता भारताला गोलदांजांमध्येही मिस्टर ३६० मिळाला आहे. भारताचे माजी स्पिनर बिशन सिंह बेदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात गोलंदाज चेंडू फेकण्याआधी पूर्ण ३६० अंशात फिरताना दिसतो. जी व्यक्ती हा व्हिडिओ पाहते ती तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाही.


हा गोलंदाज उत्तर प्रदेशचा असून त्याचं नाव शइवा सिंह आहे. शइवाने अंडर २३ सीके नायटू चषकात बंगालविरुद्ध या शैलीत गोलंदाजी केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या या सामन्यात शिवा सिंह चेंडू फेकण्याआधी स्वतः भोवती ३६० अंशात फिरला. पंचांनी या चेंडूला डेड बॉल घोषीत केलं. पंचांच्या या निर्णयामुळे यूपीचा संघ नाराज झाला. जर फलंदाजाची वेगळी शैली असू शकते तर गोलंदाजाची का नाही असा प्रश्न युपीच्या संघाने विचारला. पण तरीही पंचांनी त्यांचा निर्णय बदलला नाही आणि त्या चेंडूला डेड बॉलच घोषित केलं.Loading...२०१६ च्या आयपीएलमध्ये आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात विचित्र पद्धतीने गोलंदाजी केली होती. आंद्रे रसेलने गोलंदाजीच्या आधी थांबण्याचा अभिनय केला आणि नंतर अचानक चेंडू फेकल. शेन वॉटसन तो चेंडू खेळूच शकला नाही. मात्र रसेलच्या या गोलंदाजीमुळे तो हैराण झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 06:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close