आज भारतxदक्षिण आफ्रिकेदरम्यान 'रण'संग्राम; कोण जिंकणार टी-२०

आज भारतxदक्षिण आफ्रिकेदरम्यान 'रण'संग्राम; कोण जिंकणार टी-२०

दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्यामुळे आजच्या सामन्यात बाजी मारणारा संघ मालिकाही आपल्या नावावर करेलं.

  • Share this:

24 फेब्रुवारी : भारत-दक्षिण आफ्रिका दरम्यान अंतिम टी-२० सामना आज केप्ट टाऊनला रंगणार आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्यामुळे आजच्या सामन्यात बाजी मारणारा संघ मालिकाही आपल्या नावावर करेलं. महत्त्वाचं म्हणजे या सामन्यासोबतच भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवटही होणार आहे. त्यामुळे आजच्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

ही मालिका आणि दौऱ्याचा शेवट विजयानं साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर एकदिवसीय मालिकेतला लाजिरवाणा पराभवानंतर किमान टी-२० मालिकेत विजय मिळवण्याचं आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे असेल.

भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली, टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांपासून फक्त 17 धावा दूर आहे. आज त्याने 17 धावा करुन हा टप्पा गाठला तर टी-२० मध्ये दोन हजार धावा करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरेलं.

First published: February 24, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या