• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • India vs Pakistan: भारताचा पराभव म्हणजे इस्लामचा विजय, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची जीभ घसरली VIDEO

India vs Pakistan: भारताचा पराभव म्हणजे इस्लामचा विजय, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची जीभ घसरली VIDEO

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. भारतावरील विजयानंतर पाकिस्तानात जल्लोषाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी याबाबत जनतेचं अभिनंदन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. पाकिस्ताननं चांगला खेळ केल्यानं पराभव झाल्याचं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मान्य केलं. विराटनं मॅच संपल्यानंतर मैदानातच पाकिस्तानच्या खेळाडूंचं अभिनंदन देखील केलं. विराटसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू खिलाडू वृत्ती दाखवत असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Pakistan interior minister Sheikh Rasheed) यांची जीभ घसरली आहे. भारतावरील विजयानंतर पाकिस्तानमध्ये सध्या जल्लोष आहे. शेख रशीद यांनी पाकिस्तानच्या विजयाचा जगभरातील मुसलमान जल्लोष करत आहेत, असा दावा केला. क्रिकेटची मॅच म्हणजे युद्ध आहे असं सांगत त्यांनी यामधील विजय हा इस्लामचा विजय असल्याचं सांगत जगभरातील मुसलमानांचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शेख रशीद यांनी म्हटंलं आहे की, 'भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही पहिलीच मॅच जनतेनं सोपवलेल्या जबाबदारीमुळे मला स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहता आली नाही. पण इस्लामाबाद, रावळपिंडीच्या प्रशासनाला मी ट्रॅफिक कंटेनर्स हटवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या पद्धतीनं जल्लोष करता येईल. पाकिस्तानच्या जनतेचं अभिनंदन. आज आपली फायनल होती. भारतासह जगभरातील मुसलमानांच्या भावना पाकिस्तानसोबत होत्या. पाकिस्तानच्या विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन. पाकिस्तान जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद!' टीम इंडियानं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं  एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नव्हता. India vs Pakistan: मॅच दरम्यान नमाज पडताना मोहम्मद रिझवानचा VIDEO VIRAL
  Published by:News18 Desk
  First published: