मुंबई, 11 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध न्यूझीालंड (England vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड कप सेमी फायनल (T20 World Cup 2021) चांगलीच रंगतदार झाली. या मॅचवर बराच काळ इंग्लंडचं वर्चस्व होतं. मात्र, तीन ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं फटकेबाजी करत इंग्लंडचा 5 विकेट्स आणि 6 बॉल राखून विजय मिळवला. दोन्ही टीमनं शेवटपर्यंत मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी इंग्लंडचा ओपनर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यानं केलेल्या एका चुकीमुळे 2 वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी जाग्या झाल्या.
काय घडला प्रकार?
न्यूझीलंडच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनच्या बॉलवर जेम्स नीशम (James Neesham) यानं जोरदार फटका मारला. वेगान बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाणारा तो बॉल पकडण्याचा अवघड प्रयत्न बेअरस्टोनं केला. बेअरस्टोनं खाली पडत बॉल पकडला. आपण बांऊड्री लाईनच्या बाहेर जात असल्याचं लक्षात येताच त्यानं जवळ उभ्या असलेल्या लियाम लिविंगस्टोनकडं बॉल फेकला. पण, या सर्व गडबडीत बेअरस्टोच्या हातामध्ये बॉल असताना त्याचा गुडघा बाऊंड्री लाईनला लागला. त्यामुळे न्यूझीलंडला 6 रन मिळाले.
2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी इंग्लंडच्या इनिंगमधील 49 व्या ओव्हरमध्ये नीशमच्या बॉलिंगवर बेन स्टोक्सनं मारलेला बॉलवर न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेंट बोल्टनं मागं पळत जाऊन कॅच पकडला. पण, यावेळी त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला. त्यामुळे इंग्लंडला महत्त्वाचे 6 रन मिळाले होते. त्यानंतर इंग्लंडनं इतिहासात पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली.
इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) डेवॉन कॉनवेसोबत (Devon Conway) पार्टनरशीप करून न्यूझीलंडला सावरलं. मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडनं पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.