नवी दिल्ली, 4 मार्च : आशियाई क्रिडा स्पर्धेत टी20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2022 मध्ये होणाऱ्या हांगझू येथील स्पर्धेत महिला आणि पुरूष अशा दोन्ही संघांचे क्रिकेट सामने होतील अशी माहिती इंडियन ऑलम्पिक असोशिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिली. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही देण्याच आल्याचे राजीव मेहता यांनी सांगितले
यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेत क्रिकेटला स्थान देण्यात आलं होतं. पण 2018 मध्ये इंडोनेशियात झालेल्या स्पर्धेत क्रिकेटला स्थान दिलं नव्हतं.
भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत मात्र शंका आहे. भारताचे वेळापत्रक पाहता आशियाई गेममधून बाहेर राहण्याचे आधीच सांगितले होते. मात्र, स्पर्धेसाठी अद्याप वेळ असल्याने भारतीय संघाने खेळायचे की नाही यावर विचार करण्यासाठी बीसीसीआयजवळ वेळ आहे.
2014 मध्ये श्रीलंका पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. तर 2010 च्या स्पर्धेत बांगलादेशच्या पुरुष संघाने बाजी मारली होती. दुसरीकडे पाकिस्तानच्या महिला संघाने दोन्हीवेळा सुवर्णपदक जिंकले होते. 1998 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही क्रिकेट संघाचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले होते.
सांगलीकर स्मृतीकडे टीम इंडियाची कमान, विश्वचषकाबद्दल म्हणते...