मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सचिनसाठी खडतर होती ती 12 वर्ष! मॅचआधी रात्र-रात्र जागून काढायचा, कसा केला मास्टर ब्लास्टरने सामना?

सचिनसाठी खडतर होती ती 12 वर्ष! मॅचआधी रात्र-रात्र जागून काढायचा, कसा केला मास्टर ब्लास्टरने सामना?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तणावाचा सामना केला आहे. यांची गंभीरता इतकी होती की तो काही वर्षांपर्यंत नीट झोपूही शकला नव्हता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तणावाचा सामना केला आहे. यांची गंभीरता इतकी होती की तो काही वर्षांपर्यंत नीट झोपूही शकला नव्हता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तणावाचा सामना केला आहे. यांची गंभीरता इतकी होती की तो काही वर्षांपर्यंत नीट झोपूही शकला नव्हता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: एखाद्या खेळाडूसाठी मानसिक स्वास्थ्य (Mental Health) हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत उघडपणे बोललं देखील जात आहे. क्रिकेटपासून टेनिसपर्यंत अनेक खेळाडू त्यांच्यावर असलेल्या ताणाबाबत, दबावाबाबत, त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत भाष्य करत आहे. अलीकडेच टेनिस स्टार नाओमी ओसाका (Naomi Osaka)ने नैराश्यात असल्याचं सांगत फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती. तर अमेरिकन जिमनॅस्ट सिमोन बाइल्स (Simone Biles) ने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामना सोडला होता.

क्रिकेटमध्ये देखील अलीकडे एक महत्त्वाचं उदाहरण समोर आलं होतं. भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजपूर्वी (India vs England Test Series) इंग्लंडचा विस्फोटक ऑलराउंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) ने मानसिक आरोग्याला प्राधान्य देत ब्रेक घेतला होता. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तणावाचा सामना केला आहे. यांची गंभीरता इतकी होती की तो काही वर्षांपर्यंत नीट झोपूही शकला नव्हता.

हे वाचा-सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

सचिनने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'जर एखाद्या गोष्टीची तुम्ही पर्वा करत असाल तर त्याबाबत निश्चितच अस्वस्थता असते. मलाही माझ्या खेळाची पर्वा होत आणि जेव्हा मी बाहेर जायचो तेव्हा मला नेहमीच चांगलं खेळण्याची इच्छा असायची. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या 12 वर्षात मॅचच्या आदल्या रात्री मला नीट झोपंही लागत नसे.'

हे वाचा-IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक लगावणारा एकमेव खेळाडू सचिन पुढे म्हणाला की, 'मी नेहमी विचार करत असे की बॉलर्सचा सामना कसा करेन. ते कशी बॉलिंग करतील? माझ्याकडे काय पर्याय असतील? मी विचार करत असे आणि झोपेशी सामना करत असे. कालातरांने मी या गोष्टीला हरवू शकलो. एका दशकानंतर मला असं लक्षात आलं की मी अशाच प्रकारे सामन्यासाठी तयार होत आहे. मी त्या परिस्थिथीशी लढणं बंद केलं. मी मॅचआधी टीव्ही बघत असे. चांगलं प्रदर्शन करण्यासाठी मदत करतील अशा सर्व गोष्टी मी करत असे. मी जसंजसं स्वत:ला समजण्यास सुरुवात केली तशा गोष्टी ठीक होऊ लागल्या. मी पूर्णपणे ठीक नाही म्हणू शकत पण मला माहित होते हे सामान्य आहे. मी प्रयत्न करत असे की मी मानसिक स्तरावर शांत राहीन आणि हा विचार करणार नाही की उद्या कशाप्रकारे खेळेन?'

सचिनने अशी माहिती दिली की पूर्ण करिअर दरम्यान हा प्रकार होत असे. अगदी शेवटच्या कसोटीवेळी देखील त्याने अशाप्रकारच्या अस्वस्थतेचा सामना केला होता.

First published:

Tags: Cricket, Mental health, Sachin tendulakar