रोहित शर्माने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा पहिला फोटो

रोहित शर्माने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा पहिला फोटो

तो चौथ्या कसोटीत खेळणार नसला तर १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांत तो खेळणार आहे. ८ जानेवारीला तो पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, ०४ जानेवारी २०१९- टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने नवीन वर्षाचं स्वागत एका चांगल्या बातमीने केलं. त्याची पत्नी रितिका सजदेहने रविवारी मुलीला जन्म दिला. सिक्सर किंग रोहितने आता आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पहिल्यांदा शेअर केला आहे. रोहित आणि रितिका १३ डिसेंबर २०१५ ला लग्नबंधनात अडकले. आता त्यांनी मुलीचा फोटो शेअर करताना म्हटले की, ‘सगळ्यांना भन्नाट २०१९ वर्षाच्या शुभेच्छा.’

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर १३७ धावांनी विजय मिळवला मालिकेत २- १ अशी आघाडी घेतली होती. मुलीच्या जन्माची खबर मिळताच रोहित सोमवारी मुंबईत आला. तो चौथ्या कसोटीत खेळणार नसला तर १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांत तो खेळणार आहे. ८ जानेवारीला तो पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार आहे. रोहितने काही दिवसांपूर्वा मायकल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी बाबा होण्यासाठी फार उत्सुक आहे. तो क्षण आमचं आयुष्य बदलणारा असेल आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.’

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. रोहितने १३ डिसेंबर २०१५ मध्ये रितिकाशी विवाह केला होता. रितिका आणि रोहितची पहिली भेट २००९ मध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर रोहितने रितिकाला त्याची स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून निवडलेले.

रितिकाही युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. हळू हळू रोहित आणि रितिकाच्या भेटी गाठी वाढत गेल्या आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. अखेर ६ वर्षांच्या मैत्रीनंतर रोहितने ३ जूनला रितिकाला लग्नाची मागणी घातली. रोहितने अनोख्या पद्धतीने रितिकाला प्रपोज केलं.

रोहित रितिकाला घेऊन बोरिवली स्पोर्ट्स क्लब मैदानात गेला. इथूनच रोहितने वयाच्या ११ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मैदानात त्याने रितिकाला प्रपोज केलं. ३ जून २०१५ ला प्रपोज केल्यानंतर दोघांनी त्यावर्षी १३ डिसेंबरला लग्न केलं.

VIDEO : महिलांसाठी नागा साधू बनणं सोपं नाही, द्यावी लागते 'ही' कठीण परीक्षा

First published: January 4, 2019, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading