रोहित शर्मा लवकरच होणार बाबा, टीम इंडियाला कळल्यावर 'ही' होती प्रतिक्रिया!

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत केलेल्या एका मुलाखतीत हे मान्य केलं आहे.

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत केलेल्या एका मुलाखतीत हे मान्य केलं आहे.

  • Share this:
    मेलबर्न, २९ डिसेंबर २०१८- मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा ‘धाकड’ फलंदाज रोहित शर्माच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. हे खरं असल्याचं आता रोहितनेही मान्य केलं आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत केलेल्या एका मुलाखतीत हे मान्य केलं आहे. रोहितने ही गोष्ट जेव्हा भारतीय संघाला सांगितली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती तेही सांगितले. मायकल क्लाकसोबतच्या या मुलाखतीत बाबा होण्याच्या आपल्या भावनेबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘त्या क्षणाची मी फार  आतुरतेने वाट पाहत आहे. तो क्षण आमचं आयुष्य बदलणारा असेल. जेव्हा सहकाऱ्यांनी मी ही गोष्ट सांगितली तेव्हा ते सरप्राइज झाले आणि नंतर हसायला लागले.’ रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. रोहितने १३ डिसेंबर २०१५ मध्ये रितिकाशी विवाह केला होता. रितिका आणि रोहितची पहिली भेट २००९ मध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर रोहितने रितिकाला त्याची स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून निवडलेले. रितिकाही युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. हळू हळू रोहित आणि रितिकाच्या भेटी गाठी वाढत गेल्या आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. अखेर ६ वर्षांच्या मैत्रीनंतर रोहितने ३ जूनला रितिकाला लग्नाची मागणी घातली. रोहितने अनोख्या पद्धतीने रितिकाला प्रपोज केलं. रोहित रितिकाला घेऊन बोरिवली स्पोर्ट्स क्लब मैदानात गेला. इथूनच रोहितने वयाच्या ११ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मैदानात त्याने रितिकाला प्रपोज केलं. ३ जून २०१५ ला प्रपोज केल्यानंतर दोघांनी त्यावर्षी १३ डिसेंबरला लग्न केलं.
    First published: