Home /News /news /

पाकिस्तानच्या नावावर आहे सर्वात मोठ्या पराभवाचा रेकॉर्ड, वाचून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

पाकिस्तानच्या नावावर आहे सर्वात मोठ्या पराभवाचा रेकॉर्ड, वाचून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

वन-डे क्रिकेटच्या इतिहासात (ODI Cricket) सर्वात मोठ्या पराभवाचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्ताननं किती रननं पराभव स्विकारला होता हे वाचल्यावर तुमचा डोळ्यांवर क्षणभर विश्वास बसणार नाही.

    मुंबई, 2 डिसेंबर: वन-डे क्रिकेट म्हणजेच 50 ओव्हर्सच्या खेळात 300 रन होणे ही आता सामान्य गोष्ट बनली आहे. पण, आजही या प्रकारात 400 रन सहज होत नाहीत. त्यामुळे एखाद्या टीमनं 400 पेक्षा जास्त रननं विजय मिळवला असेल तर ती अगदीच दुर्मीळ बाब आहे. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटच्या इतिहासात आजवर हे फक्त एकदाच झालं आहे. 24 वर्षांपूर्वी 1997 साली पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमच्या (Pakistan Cricket Team) नावावर या लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तानचा (Pakistan vs New Zealand) तब्बल 408 रननं पराभव केला होता. 29 जानेवारी 1997 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये ही मॅच झाली होती. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 455 असा विशाल स्कोअर केला. कॅप्टन मिया लेविसनं 72 बॉलमध्ये 105 रन काढले. तसेच अन्य तीन जणींनी अर्धशतक झळकावलं. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलर्सनी तब्बल 40 रन अतिरिक्त दिले. फक्त 2 सिक्स न्यूझीलंडच्या टीमनं 9 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं रन बनवले. पण, त्यांनी संपूर्ण इनिंगमध्ये फक्त 2 सिक्स लगावले. ओपनर डिबी हॉकलेनं 68 बॉलमध्ये 88, ट्रूडी एन्डरसननं 65 बॉलमध्ये 85 आणि क्लेरा निकल्सननं 53 बॉलमध्ये नाबाद 73 रन काढले. पाकिस्तानच्या कॅप्टननं तब्बल 8 बॉलर्सचा वापर केला. यामधील तीन बॉलर्सनं 80 पेक्षा जास्त रन दिले. शर्मीन खान सर्वात महागडी ठरली. तिनं 10 ओव्हर्समध्ये 87 रन दिले. पण, 2 विकेट्सही घेतल्या. पाकिस्तानचे लोटांगण 456 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली पाकिस्तामची टीम 23 ओव्हर्समध्ये फक्त 47 रनवर ऑल आऊट झाली. त्यांच्या टीममधील 9 जणींना दोन अंकी रन देखील करता आले नाहीत. त्यांच्या टीममधील सर्वाधिक स्कोअर 11 होता. न्यूझीलंडनं फक्त 4 बॉलर्सचा वापर करत पाकिस्तानचा तब्बल 408 रननं पराभव केला. न्यूझीलंडकडून क्लेरा निकल्सननं 18 रन देत 4 विकेट्स घेतल्या. 20 वर्षांच्या खेळाडूनं 20 मिनिटांमध्ये संपवली मॅच, 6 सिक्स लगावत केला नवा रेकॉर्ड सर्वात मोठ्या विजयांचा इतिहास पुरुष आणि महिला या दोघांच्याही वन-डे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडनं मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. गेल्या 24 वर्षांपासून हा रेकॉर्ड कायम आहे. महिला क्रिकेटमधील दुसरा मोठा पराभव देखील पाकिस्तानच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 374 रननं पराभव केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आजवर एकाही टीमला 300 पेक्षा जास्त रननं विजय मिळवता आलेला नाही. पुरुषांच्या क्रिकेटमध्येही सर्वाधिक रननं विजय मिळवण्याचा रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी आयर्लंडचा 2008 साली 290 रननं पराभव केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Pakistan

    पुढील बातम्या