Home /News /news /

विराटच्या सहकाऱ्यानं शाकिब अल हसनच्या ओव्हरमध्ये लगावले 5 सिक्स! युवराजची आली आठवण

विराटच्या सहकाऱ्यानं शाकिब अल हसनच्या ओव्हरमध्ये लगावले 5 सिक्स! युवराजची आली आठवण

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडियानं नॉटिंघम टेस्टवर वर्चस्व मिळवलंय. त्याचवेळी त्याच्या आरसीबी टीममधील सहकाऱ्यानं बांगलादेशविरुद्ध वादळी खेळी केली आहे.

    मुंबई, 8 ऑगस्ट : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडियानं नॉटिंघम टेस्टवर वर्चस्व मिळवलंय. त्याचवेळी त्याच्या आरसीबी टीममधील सहकाऱ्यानं बांगलादेशविरुद्ध वादळी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं बांगलादेश दौऱ्यात पहिला विजय मिळवला आहे.  शुक्रवारी झालेल्या चौथ्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर डेनियल ख्रिस्टीननं (Daniel Christian) 15 बॉलमध्ये 39 रनची वादळी खेळी केली. ख्रिस्टीननं या खेळीत शाकिब अल हसनच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावले. विशेष म्हणजे वन-डे, आंतरराष्ट्रीय टी20 आणि आयपीएलमध्ये सर्वोत्तम स्कोअर हा 39 आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटींग करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 105 रनचं लक्ष्य ठेवलं. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन मॅथ्यू वेड पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. वेड आऊट झाल्यानंतर ख्रिस्टीन मैदानात आला. त्यानं ऑस्ट्रेलियन इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये बांगलादेशच्या सर्वात अनुभवी बॉलरवर हल्ला केला. शाकिबच्या पहिल्या तीन बॉलवर त्यानं तीन मोठे सिक्सर लगावले. ख्रिस्टीनचा धडाका पाहून तो युवराजच्या सलग सहा सिक्सच्या रेकॉर्डची बरोबरी करणार असाच अंदाज होता. IND vs ENG: नीरजनं संपवली 121 वर्षांची प्रतीक्षा, आता 89 वर्षांनी टीम इंडिया करणार इतिहास त्यावेळी त्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स लगावण्यात ख्रिस्टीनला अपयश आले. त्यानंतर पुढच्या दोन बॉल ख्रिस्टीननं पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर टोलावले. अशा प्रकारे त्याने शाकिबच्या एका ओव्हरमध्ये 30 रन काढले.  एका ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावणारा ख्रिस्टीन हा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. पाच मॅचच्या या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत बांगलादेशनं विजयी आघाडी घेतली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या