India vs Australia- अश्लिल भाषेमुळे रवी शास्त्री सोशल मीडियावर ट्रोल

India vs Australia- अश्लिल भाषेमुळे रवी शास्त्री सोशल मीडियावर ट्रोल

अटीतटीच्या सामन्याचं वर्णन करताना असे काही शब्द प्रयोग केले जे कोणत्याही टीव्हीवर दाखवले जाऊ शकत नाही तसेच वेबसाइटवरही ते शब्द लिहू शकत नाही.

  • Share this:

एडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवला. सध्या टीम इंडियाचं सर्व बाजूंनी कौतुक केलं जात आहे. मात्र त्यांचा प्रशिक्षक मात्र अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर रवी शास्त्रींना पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे. सामना जिंकल्यानंतर रवी शास्त्रींनी सुनील गावस्कर यांच्यासोबत लाइव्ह शोमध्ये अश्लिल विधान केले. याच विधानामुळे शास्त्री ट्रोल होत आहेत.

शास्त्री यांनी टीम इंडियाच्या अटीतटीच्या सामन्याचं वर्णन करताना असे काही शब्द प्रयोग केले जे कोणत्याही टीव्हीवर दाखवले जाऊ शकत नाही तसेच वेबसाइटवरही ते शब्द लिहू शकत नाही. रवी शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करायला सुरुवात केली.

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आर, अश्निनने हेजलवूडला बाद करत भारतासाठी विजय सुकर करुन दिला. भारतासाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर इशांत शर्माने १ गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज शॉन मार्शने सर्वाधिक ६० धावा केल्या. मार्शशिवाय कोणत्याही फलंदाजाने ४० च्या पुढे धावा केल्या नाहीत. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पहिल्या डावात १२३ धावा तर दुसऱ्या डावात ७१ धावा करुन भारतासाठी धावांचा डोंगर उभा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. मॅन ऑफ दी मॅच म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला.

भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने एक इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात तब्बल १० वर्षांपूर्वी धूळ चारली होती. २००८ मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली आहे. या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला.

VIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल

First published: December 10, 2018, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading