या मंदिरात जाण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना नेसावी लागली लुंगी

शिखर आणि उमेश दोघांनाही देवाच्या आशिर्वादाची गरज आहे

  • Share this:

एकदिवसीय सामन्याच्या शेवटच्या सामन्यात भारताला एकहाती विजय मिळाला. हा सामना भारतासाठी फार महत्त्वपूर्ण होता. कारण या सामन्यातूनच भारत मालिका जिंकणार की अनिर्णित राहणार यावर शिक्कामोर्तब होणार होतं.

बुधवारी नेट प्रॅक्टीस झाल्यावर टीम इंडियाचे काही खेळाडू पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेले. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन, जलदगती गोलंदाज उमेश यादव आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विष्णुच्या सर्वात प्रसिद्ध मंदिराला भेट दिली.

यावेळी तिथल्या रितीरिवाजाप्रमाणे त्यांना सफेद लुंगी नेसावी लागली होती.

भारतातील प्रमुख वैष्णव मंदिरांपैकी एक पद्मनाभस्वामी मंदिर आहे. १६ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे.

अशी आख्यायिका आहे की, सर्वात आधी इथे विष्णुची मुर्ती मिळाली. ज्यानंतर त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं. मंदिराच्या गाभाऱ्यात विष्णुची भली मोठी मुर्ती आहे. मंदिराचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक तिरुअनंतपुरम येथे येतात.

Loading...

शिखर आणि उमेश दोघांनाही देवाच्या आशिर्वादाची गरज आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत शिखरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडू शकला नाही. चांगली सुरूवात करूनदेखील तो मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. उमेश यादवही गडी बाद करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...