News Bulletin : पाऊस, अपघात, क्रिकेट आणि राजकारण... दिवसभरातल्या घडामोडी पाहा एका क्लिकवर!

'वायू'चा मोठा धोका टळला असला तरी पाऊस हीच आजची मोठी बातमी ठरली. भारताचा वर्ल्ड कपचा सामना अखेर पावासमुळे रद्द करावा लागला. मुंबईत पहिल्या वादळी पावसात बरीच तारांबळ उडाली. महाराष्ट्रात मोठी बातमी ठरली औरंगाबादच्या महानगरपालिकेतल्या राड्याची आणि अर्थातच एक्स्प्रेस वे वरच्या अपघाताची. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 08:28 PM IST

News Bulletin : पाऊस, अपघात, क्रिकेट आणि राजकारण... दिवसभरातल्या घडामोडी पाहा एका क्लिकवर!

मुंबई, 13 जून : एकीकडे वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाळी हवा अनुभवायला मिळाली असली, तरी त्याच हवेनं क्रिकेट रसिकांचा मात्र घात केला. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधला सामना अखेर पावसामुळे रद्द झाला. आता रविवारच्या भारत- पाकिस्तान सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आजचा सामना रद्द झाल्यामुळे विराटच्या स्वप्नावर पावसाचं पाणी फिरलं, सचिनच्या विक्रमापासून तो दूरच राहिला!


महाराष्ट्रात वायू वादळाने थोडा वेळ काळजाचा ठोका चुकवला. पण गुजरातकडे सरकलेल्या या अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाने गुजरात किनारपट्टीवर न धडका पुन्हा दिशा बदलली आहे. तरीही या वादळाचा गुजरातला धक्का बसलाच. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर आलेल्या पावसाने गुजराती किनारपट्टी धुवून निघाली. रेल्वे स्टेशनवरील बेंचेसही वादळामुळे उडाले त्याचा व्हिडिओ पाहा इथे.


महाराष्ट्रासाठी मोठी बातमी ठरली औरंगाबाद महापालिकेची. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वाद झाला. शिवसेनेच्या महापौर नंदू घोडीले यांनी प्रस्तावाला विरोध केला. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या 20 नगरसेवकांचं सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आलं. एवढंच नाहीतर एमआयएमच्या नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. औरंगाबाद पालिकेत सेनेचा राडा झाला. त्यावर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया इथे पाहा

Loading...


अमित शहांचा गृहमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता पक्षाचं नेतृत्व कोण करणार याची चर्चा सुरू होती. भाजप अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. सत्ताधारी भाजपमध्ये एक व्यक्ती, एक पद हे धोरण असले तरी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका या अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त वाचा इथे


महाराष्ट्रातही भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. रावसाहेब दानवे आता केंद्रात मंत्री झाल्याने हे पद रिक्त होऊ शकतं. जातीय समीकरणांचा विचार करता प्रदेशाध्यक्षपदी मराठा नेत्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुठलं नाव चर्चेत आहे पाहा इथे


भारताच्या चांद्रयान 2 ची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच ISRO आणखी दोन नवे विक्रम करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था  ISROने चांद्रयान -2 नंतर आणखी दोन नवे संकल्प सोडले आहेत. चांद्रयान -2 साठी 15 जुलैला यान झेपावणार आहे. या मोहिमेनंतर ISROने आणखी दोन नव्या महत्त्वाकांक्षी मोहिमा राबविणार आहे. ISRO चे प्रमुख के सिवन यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. अवकाशात भारताचं अंतराळस्थानक उभारणं आणि मानवी उपग्रह पाठवणं असे दोन संकल्प ISROने सोडले आहेत. हा आहे इस्रोचा 'मेगा प्लान'


पहिल्याच मोठ्या पावसात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बस उलटली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी शर्मा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस माडप बोगद्याजवळ उलटली आहे. सविस्तर बातमी इथे वाचा

मुंबईकरांना पाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 07:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...