Home /News /news /

रोहित शर्मासाठी डिसेंबर आहे लकी, या महिन्यात हमखास मिळते Good News

रोहित शर्मासाठी डिसेंबर आहे लकी, या महिन्यात हमखास मिळते Good News

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. रोहितच्या या नियुक्तीनंतर त्याच्या आयुष्यातील डिसेंबर महिन्याचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पुढील महिन्यात वन-डे सीरिज आहे. या सीरिजपासून रोहित शर्मा वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन असेल. रोहित शर्माला ही जबाबदारी मिळणार याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात झाले आहे. रोहितच्या या नियुक्तीनंतर त्याच्या आयुष्यातील डिसेंबर महिन्याचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. पहिल्यांदा कॅप्टन आणि... रोहित शर्मा टीम इंडियाच्या वन-डे टीमचा सर्वात प्रथम डिसेंबर महिन्यातच कॅप्टन झाला होता. विराटच्या अनुपस्थितीमध्ये डिसेंबर 2017 साली वन-डे टीमचा कॅप्टन झाला होता. वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून दुसऱ्याच मॅचमध्ये रोहितनं बॅटने कमाल केली होती. त्याने वन-डे क्रिकेटमधील तिसरं द्विशतक झळकावले. श्रीलंकेविरुद्ध मोहालीत झालेल्या त्या मॅचमध्ये रोहितनं 153 बॉलमध्ये 13 फोर आणि 12 सिक्ससह नाबाद 208 रन केले होते. वेगवान शतक रोहित शर्मानं डिसेंबर 2017 साली टी20 क्रिकेटमधील त्याचे वेगवान शतक झळकावले होते. त्याने श्रीलंका विरुद्धच्या टी20 मॅचमध्ये फक्त 36 बॉलमध्ये शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाची बरोबरी केली होती. विराट कोहली आता टेस्ट टीमचीही कॅप्टनसी सोडणार! जाणून घ्या 5 कारणं मैदानाबाहेरही खास रोहितसाठी फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही तर मैदानाच्या बाहेरही डिसेंबर महिना खास आहे. त्याने 13 डिसेंबर 2015 रोजी रितिका सजदेहशी लग्न करत (Ritika Sajdeh) आयुष्यातील नव्या पर्वाला सुरूवात केली होती. त्याचबरोबर 30 डिसेंबर 2018 रोजी रोहित आणि रितिकाची मुलगी समायरा ((Samaira Sharma) जन्म झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या