इम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले

इम्रान खानसाठी सिद्धूंनी खास भेटही सोबत नेली आहे. खान यांच्यासाठी सिद्धूंनी काश्मिरी शाल घेऊन गेले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2018 11:29 PM IST

इम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले

पाकिस्तान,17 आॅगस्ट : इम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.

सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीनंतर झालेल्या बदलाचं स्वागत केलंय. इम्रान खान यांनी आता दोन्ही देशात शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी इच्छा सिद्धूंनी बोलून दाखवली. तसंच मी भारताकडून सद्भावना दूत म्हणून पाकिस्तानमध्ये जात आहे असं सिद्धू यांनी सांगितलं.

तसंच मी एक राजकीय नेता म्हणून नाहीतर एक मित्र म्हणून जात आहे. माझा मित्र इम्रानच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी पाकिस्तानाला जात असल्याचं सिद्धू यांनी सांगितलं.

इम्रान खानसाठी सिद्धूंनी खास भेटही सोबत नेली आहे. खान यांच्यासाठी सिद्धूंनी काश्मिरी शाल घेऊन गेले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा दोन्ही देशामध्ये शांतता कायम राखण्यासाठी पुढाकार घेतला होता. जर शेजाऱ्याच्या घरात आग लागली असेल तर आपल्यालाही याचा धोका आहे असंही सिद्धू म्हणाले.

Loading...

इम्रान खान यांच्याबद्दल सिद्धू म्हणतात, मी त्याला कमजोरीला आपली ताकद बनवताना पाहिलंय. मी प्रार्थना करतो की इम्रान देशाच्या भल्ल्यासाठी काम करतील.

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. पण खासगी कारणामुळे त्यांनी शपथविधीला जाण्यास नकार कळवला होता.

नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2018 11:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...