केएल राहुल- मुरली विजयची जोडी अपयशी, सोशल मीडियावर दोघंही ट्रोल

केएल राहुल- मुरली विजयची जोडी अपयशी, सोशल मीडियावर दोघंही ट्रोल

मुरली विजय आणि राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून परदेशी दौऱ्यात एकदाही ५० किंवा त्याहून जास्तीची सुरुवात करुन दिलेली नाही.

  • Share this:

एडिलेड, ०६ डिसेंबर २०१८- क्रिकेक जगतात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या ‘युद्धाला’ एक वेगळंच महत्त्व आहे. दोन्ही संघाला हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. मात्र, सध्याची भारताची फलंदाजी पाहता. हा सामना जिंकणं भारताला कठीण आहे. कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी केएल राहुल आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीवर होती. मात्र या दोघांनीही सपशेल निराशा केली. राहुल फक्त २ धावा करुन बाद झाला. तेव्हा भारताच्या खात्यात फक्त ३ धावा होत्या. कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मुरली विजयने ११ धावा करत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. भारताची सलामीची जोडी अवघ्या १५ धावांमध्ये बाद झाली. याचा पूर्ण ताण इतर खेळाडूंवर आला.

मुरली विजय आणि राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून परदेशी दौऱ्यात एकदाही ५० किंवा त्याहून जास्तीची सुरुवात करुन दिलेली नाही. या जोडीने आतापर्यंत ०, ४८, ४, ३, २८, ११, ७, ०, ०, आणि ३ धावांची भागेदारी केली आहे. या दोघांच्या भागीदारीची सरासरी फक्त १०.४० आहे. भारताबाहेर १० कसोटी सामन्यात सलामीच्या जोडीचे हे सर्वात खराब प्रदर्शन आहे. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचे एलेक बॅनरमॅन आणि पर्सी मॅकडूनेल यांच्या नावावर होता. या दोघांनी ऑस्ट्रेलिया बाहेर १०.९० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. बांग्लादेशचे हनान सरकार आणि जावेद उमर (१३.१४) हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

गेल्या ९ कसोटी सामन्यात केएल राहुलने फक्त एलबीडब्ल्यू आणि त्रिफळाचीतच झाला आहे. तो चार वेळा एलबीडब्ल्यू आणि चारवेळा त्रिफळाचीत झाला आहे. सततच्या अपयशामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

११ च्या आकड्यात अडकला मुरली विजय- एडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात मुरली ११ धावा करुन बाद झाला. मुरली चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांवर बाद झाला आहे. २०१३ मध्ये दिल्लीत, २०१४ मध्ये मेलबर्नमध्ये, २०१७ मध्ये धर्मशाला आणि आज २०१८ मध्ये एडिलेडमध्ये ११ धावांवर मुरली बाद झाला आहे.

सोशल मीडियावर मुरली- राहुल झाले ट्रोल- या दोघांच्या अपयशामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. यातही केएल राहुलला नेटकर मोठ्याप्रमाणात ट्रोल करत आहेत.

First published: December 6, 2018, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading