Viral Video- धोनीसोबत भोजपुरी आणि तमिळमध्ये बोलते झीवा

Viral Video- धोनीसोबत भोजपुरी आणि तमिळमध्ये बोलते झीवा

धोनीने शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगी झिवासोबतचा मजा मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला

  • Share this:

टीम इंडियाचा यष्टीरक्षक एम.एस.धोनी सध्या आपला संपूर्ण वेळ कुटुंबाला देत आहे. त टीम इंडियाच्या टी२० संघाचा भाग नाहीये. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला नाही. पुढच्या वर्षी जानेवारीत सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकांमध्ये धोनी दिसणार आहे. धोनीने शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगी झिवासोबतचा मजा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये दोघंही दोन भाषांमध्ये बोलताना दिसत आहेत. झिवा आपल्या बाबांसोबत भोजपुरी आणि तमिळ या दोन भाषांमध्ये बोलत आहे. झिवा पहिल्यांदा धोनीला भोजपुरीमध्ये विचारते, ‘ए महेंद्र सिंग धोनी कैसन बा?’ यावर धोनी ठिक बा असं उत्तर देतो. त्यानंतर लगेच झिवा त्याला तमिळमध्ये हाच प्रश्न विचारते, ‘इपड्डी इरुकिंगा’ (तुम्ही कसे आहात) या प्रश्नाचं उत्तर देताना धोनी म्हणतो की, ‘नान नल्ला इरुकेन’ (मी चांगला आहे.)

 

View this post on Instagram

 

Greetings in two language

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

धोनीने हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शनिवारी शेअर केला. अगदी काही मिनिटांतच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. धोनीने शुक्रवारी झिवासोबतचाच एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो झिवाचा ससा बनला होता. या व्हिडिओमध्ये झिवा आपल्या बाबांना गाजर भरवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Ziva’s bugs bunny @zivasinghdhoni006

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

धोनी पुढच्या वर्षी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार आहे. १२ जानेवारीला सिडनीमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात येणार आहे. धोनीसाठी २०१८ हे वर्ष अत्यंत वाईट होतं. २० एकदिवसीय सामन्यात २५ च्या सरासरीने त्याने फक्त २७५ धावा केल्या. संपूर्ण वर्षात त्याने एकदाही अर्धशतकी खेळी खेळली नाही. त्यामुळे किमान पुढच्या वर्षीतरी धोनीचा आधीचा फॉर्म परत येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

First published: November 25, 2018, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading