लष्करातून परतल्यानंतर धोनी झाला नेता, समोर आले Photo

विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर लष्करी प्रशिक्षण घेऊन धोनी 15 ऑगस्टला घरी परतला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 12:47 PM IST

लष्करातून परतल्यानंतर धोनी झाला नेता, समोर आले Photo

मुंबई, 23 ऑगस्ट : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवरून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला पराभव पत्करावा लागल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत लष्करात ट्रेनिंग घेतलं. धोनी 15 ऑगस्टला लष्कराच्या ट्रेनिंगवरून परत आला असून तो नव्या अवतारात दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा धोनी राजकारणात जाणार अशी चर्चा रंगली आहे.

भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा नेत्याच्या पोशाखातील फोटो सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत धोनी टीम इंडियाच्या जर्सी शिवाय लष्कराच्या वर्दीत दिसला होता. मात्र, आता तो चक्क नेत्याच्या अवतारात दिसला आहे. मुंबईत एका जाहीरातीच्या शूटिंगवेळी धोनी नेता झाला होता. त्याच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

मुंबईत झालेल्या या शूटिंगमध्ये धोनीने एका नेत्याच्या पोषाखात दिसला. रॅलीमध्ये लावण्यात येणाऱ्या कटआऊटसारखे धोनीचे कटआऊट लावले होते. यामध्ये दोनी कुर्ता आणि गांधी टोपी घातलेला दिसत आहे. तसेच दोन्ही हात जोडून उंचावत अभिवादन केलं आहे. ज्याप्रमाणे नेतेमंडळी व्यासपीठावरून कार्यकर्त्यांकडे पाहून हात जोडतात तसाच धोनीचा हा फोटो आहे. दरम्यान हा फोटो एडीट करून लावण्यात आला आहे की प्रत्यक्ष धोनीच्या फोटोचे कटआऊट तयार करण्यात आले हे समजू शकले नाही.

Loading...

धोनीच्या निवृत्तीवरून भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे की त्याला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जर त्याला आपण फीट असल्याचं वाटत असेल तर त्याच्या खेळण्यात काही अडचण नाही. मात्र, निवड समितीला जर धोनीच्या फिटनेस आणि खेळाबद्दल शंका वाटत असेल तर त्याची कल्पना धोनीला द्यायला हवी. अशा प्रकारात खेळाडू आणि निवड समितीमध्ये चर्चा व्हायला हवी.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 12:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...