News18 Lokmat

रात्री १२ वाजता या व्यक्तीला गिफ्ट देऊन धोनीने सर्वांना केले होते चकीत

पाकिस्तानचे नागरिक मोहम्मद बशीर यांनी महेंद्रसिंग धोनीबद्दल केला खुलासा

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2018 12:58 PM IST

रात्री १२ वाजता या व्यक्तीला गिफ्ट देऊन धोनीने सर्वांना केले होते चकीत

पाकिस्तानचे नागरिक मोहम्मद बशीर, यांना संपूर्ण जग बशीर चाचा किंवा चाचा शिकागो या नावाने ओळखतात. नुकताच बशीर यांनी महेंद्रसिंग धोनीशी निगडीत एक मोठा खुलासा केला आहे.

एशिया कपच्या अंतिम सामन्याच्या एक दिवसआधी धोनी त्यांच्या हॉटेल रूमवर गेला. तिथे बशीर चाचांची भेट घेतल्यावर त्यांना चक्क टीम इंडियाचं टी-शर्ट गिफ्ट केलं.

बशीर म्हणाले की, रात्री १२ वाजता रुमची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर चक्क धोनी उभा होता. आम्ही एकाच मजल्यावर राहत होतो.

त्याने मला नवकोरं टी-शर्ट भेट म्हणून देत हे टी- शर्ट तुम्ही वापरा असं प्रेमाने सांगितलं. धोनीच्या या अनोख्या भेटीमुळे बशीर चाचा भलतेच खूश झाले.

धोनीने दिलेल्या टी-शर्टचा मान राखत त्यांनी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे टी-शर्ट घातले होते. एशिया कपचा अंतिम सामना भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला होता.

Loading...

चाचा शिकागो हे टीम इंडिया आणि धोनीचे फार मोठे चाहते आहेत. २०११ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्याचे तिकीट बशीर चाचा यांच्याकडे नव्हते. तेव्हा त्यांच्या मदतीला धोनी धावून आला. धोनीने त्यांना उपांत्य फेरीच्या सामन्याचे तिकीट दिले.

काही दिवसांपूर्वी चाचा शिकागो आणि सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता सुधीर गौतम यांची मदत केली होती. चाचा शिकागो यांनी सुधीर यांच्यासाठी फक्त क्रिकेटच्या सामन्याचे तिकीट काढले नाही तर दुबईचं येण्या जाण्याच्या विमान प्रवासाचे तिकीटही त्यांनीच काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...