मिताली राज मला ब्लॅकमेल करायची- रमेश पोवार

मितालीने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ग्रुप मॅचच्याआधी घरी परतण्याची आणि निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती

  • Share this:

भारतीय महिला क्रिकेट संघाची ‘रन मशीन’ अशी ओळख असलेल्या मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातला वाद आता चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी मितालीने रमेश पोवारवर तिला अपमानित केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता रमेशने बीसीसीआयलासमोर आपली बाजू मांडली आहे.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रमेशने मितालीवर ब्लॅकमेल करण्यासारखा गंभीर आरोप केला आहे. क्रिकइन्फोला रमेशने बीसीसीआयला दिलेला एक रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये त्याने मितालीवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

रमेश पोवारने बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये मितालीवर आरोप केले की, मितालीने निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती. पोवार दिलेल्या रिपोर्टनुसार, मिताली राजने सामन्यात ओपनिंग न दिल्याबद्दल वर्ल्ड टी२० नंतर निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती. एवढंच नाही तर पोवारने आरोप केला की, मितालीने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ग्रुप मॅचच्याआधी घरी परतण्याची आणि निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती.

मिताली संघापेक्षा स्वतःच्या फायद्याची गोष्ट आधी पाहते. ती मीटिंगमध्ये आपलं मत देत नाही. ग्रुप स्टेजमध्ये टॉप केल्यानंतरही मिताली एक शब्दानेही काही बोलली नाही.

पोवारच्या म्हणण्यानुसार, मिताली राजला टीम प्लॅन समजत नाही आणि ती स्वतःच्या मर्जीनेच खेळते. संघातील तिची भूमिका काय आहे याचा विचार करून खेळत नाही तर स्वतःच्या रेकॉर्डसाठी खेळते.

रमेश हेही म्हणाला की, त्याने मितालीसोबत पॉवर हिटिंग, बॅटिंग स्किल्स आणि रनिंग सुधारण्यावर चर्चा केली. सराव सामन्यात मिताली फार हळू खेळत होती. विंडीजच्या मैदानावर तिला फलंदाजी करताना त्रास होत होता. मितालीने जलद धावा करण्याचा प्रयत्नही केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 02:30 PM IST

ताज्या बातम्या