रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी परतले कपिल देव

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी परतले कपिल देव

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev)यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी कपिल देव यांचा एक फोटो शेयर करुन ही माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev)यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी कपिल देव यांचा एक फोटो शेयर करुन ही माहिती दिली आहे. 61 वर्षांच्या कपिल देव यांना गुरुवारी छातीत दुखायला लागल्यानंतर दिल्लीच्या ओखला भागातल्या फोर्टिस एस्कोर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या आपात्कालिन विभागात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने सुरुवातीला दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये कपिल देव यांची छाती दुखत असल्याचं सांगितलं, पण नंतर कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती रुग्णालयाने दिले. कपिल देव यांची रात्रीच एन्जियोप्लास्टी करण्यात आली.

चेतन शर्मा यांनी रुग्णालयातले डॉक्टर अतुल माथुर आणि कपिल देव यांचा एक फोटो शेयर केला आहे. डॉक्टर माथुर यांनीच कपिल देव यांची एन्जियोप्लास्टी केली आहे. कपिल देव आता बरे होऊन घरी जात असल्याचं चेतन शर्मा या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

याआधी कपिल देव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानणारं एक ट्विटही केलं होतं. तुमच्या शुभेच्छांमुळे मी लवकर बरा होत आहे, असं कपिल देव त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले होते.

कपिल देव हे जगातले एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त (434) विकेट आणि 5 हजारांपेक्षा जास्त रन केले. 1999 आणि 2000 साली कपिल देव टीम इंडियाचे प्रशिक्षकही होते. कपिल देव यांना 2010 साली आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिलं. हरियाणा हरिकेन नावाने ओळख असलेले कपिल देव भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नलही आहेत. 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, त्या टीमचे कपिल देव कर्णधार होते.

Published by: Shreyas
First published: October 25, 2020, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या