'दुसऱ्या दिवशी पायांवर उभा राहता येत नाही', आर्चरनं शेअर केला VIDEO

'दुसऱ्या दिवशी पायांवर उभा राहता येत नाही', आर्चरनं शेअर केला VIDEO

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं त्याच्या कसोटी पदार्पणात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जोरदार दणका दिला.

  • Share this:

लॉर्ड्स, 19 ऑगस्ट : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं सध्या क्रिकेट जगतात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्याच्या वेगवान माऱ्यासमोर फलंदाजांची घाबरगुंडी उडाली आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गतीच्या जोरावर फलंदाजांमध्ये भीती निर्माण केल्यानंतर जोफ्रा आता कसोटी क्रिकेटमध्ये दम दाखवत आहे. मात्र, गोलंदाजी केल्यानंतर आपली अवस्था दुसऱ्या दिवशी कशी होते याचा एक लहानसा व्हिडिओ आर्चरनं ट्विट केला आहे. वेगवान गोलंदाजीशिवाय आर्चरचे ट्विट सर्वात जास्त चर्चेत असतात.

वर्ल्ड कपवेळीसुद्धा आर्चरचे जुने ट्विट व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या आर्चरनं आता एक जीआयएफ इमेज शेअर केली आहे. त्यात एक वयोवृद्ध व्यक्ती सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला उठण्यासाठी त्रास होत असल्याचं त्यात दिसतं. आर्चरनं त्या व्हिडिओला शेअर करताना म्हटलं आहे की, दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून जागं झाल्यावर माझी अवस्था.

इंग्लंड क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरला संधी दिली. यावेळी फॉर्ममध्ये असलेला स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा तो मैदानावरच कोसळला. डॉक्टरांनीत त्याच्यावर मैदानातच उपचार केले पण पुढे न खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळं स्मिथ रिटायर्ड हर्ट झाला.

दरम्यान स्मिथला पर्याय म्हणून आलेला मार्नस लाबुशेन पहिल्या चेंडूवर आर्चरचा शिकार झाला. पहिलाच चेंडू त्याच्या तोंडावर आदळला. त्यानंतर लाबूशेनलासुद्दा लगेचच फिजिओची मदत घ्यावी लागली. लाबूशनने बदली खेळाडू म्हणून फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीने ऑस्ट्रेलियानं सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

नाना पाटेकर यांनी घेतली अमित शहांची भेट, EXCLUCIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या