मुंबई, 11 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या निवृत्तीनंतरही धोनीची लोकप्रियता कायम आहे. कुशल कॅप्टन, आक्रमक बॅट्समन आणि चपळ विकेट किपर अशी धोनीची ओळख आहे. त्याची प्रत्येक कृती भारतीय फॅन्समध्ये चर्चेचा विषय असते. जगभरातील क्रिकेटपटूंमध्येही धोनीबद्दल आदराची भावना आहे. त्याचवेळी एका भारतीय क्रिकेटपटूनं धोनीबद्दल एक अजब वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.
भारतीय महिला टीमची प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स ((Jemimah Rodrigues) सध्या इंग्लंडमधील हंड्रेड स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील एका मॅचच्या कॉमेंट्रीसाठी जेमिमाला बोलवण्यात आले होते. त्यावेळी तिला तुझा आवडता विकेट किपर बॅट्समन कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जेमिमाननं ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टचं नाव घेतलं. मात्र त्यानंतर तिनं काही क्षणात माफ करा, महेंद्रसिंह धोनी असं उत्तर दिलं. 'भारतामधील लोकं मला मारुन टाकतील', असं मजेदार वक्तव्य तिनं यावेळी केलं. जेमिमाचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
जेमिमा द हंड्रेड या स्पर्धेत सध्या जोरदार फॉर्मात आहे. तिनं पाच मॅचमध्ये 60.25 च्या सरासरीनं 241 रन काढले असून तिचा स्ट्राईक रेट 154.58 आहे. तिचा सर्वोच्च स्कोर 92 आहे. या स्पर्धेत किमान 100 रन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूपेक्षा तिची सरासरी आणि स्ट्राईक रेट कमी नाही.
'आम्हाला एकटं सोडू नका', राशिद खानचं जागतिक नेत्यांना कळकळीचं आवाहन
जेमिमानं तीन अर्धशतकं देखील झळकावली आहेत. तिच्या या आक्रमक बॅटींगमुळे तिची टीम नॉर्दन सुपरचार्जर्स तीन विजयासंह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापैकी दोन विजयात जेमिमाचे मोलाचे योगदान होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, MS Dhoni