मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IPL 2022 : बायकोचा धोका, धोनीचा अडथळा तरी मानली नाही हार! Inspirational आहे RCB च्या DK ची स्टोरी

IPL 2022 : बायकोचा धोका, धोनीचा अडथळा तरी मानली नाही हार! Inspirational आहे RCB च्या DK ची स्टोरी

कार्तिक (Dinesh Karthik) या आयपीएलमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं तीन मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 90 रन केले असून तो एकदाही आऊट झालेला नाही.

कार्तिक (Dinesh Karthik) या आयपीएलमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं तीन मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 90 रन केले असून तो एकदाही आऊट झालेला नाही.

कार्तिक (Dinesh Karthik) या आयपीएलमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं तीन मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 90 रन केले असून तो एकदाही आऊट झालेला नाही.

    मुंबई, 6 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं  (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 मधील दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी मंगळवारी झालेल्या एका थरारक मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 4 विकेट्सनं पराभव केला. आरसीबनं विजयासाठी आवश्यक असलेलनं 170 रनचं लक्ष 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 23 बॉलमध्ये 44 रनची नाबाद खेळी केली. आरसीबीची अवस्था 5 आऊट 87 होती त्यावेळी कार्तिक बॅटींगला आला. त्याने मैदानावर येताच फटकेबाजी करत राजस्थानच्या तोंडातून विजयाचा घास पळवला. कार्तिकनं या मॅचमध्ये 7 फोर आणि 1 सिक्स लगावला. त्याने शाहबाज अहमदसोबत 32 बॉलमध्ये 67 रनची पार्टनरशिप करत मॅच आरसीबीच्या बाजूनं वळवली. कार्तिक या आयपीएलमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं तीन मॅचमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 90 रन केले असून तो एकदाही आऊट झालेला नाही. आरसीबीनं त्याला फिनिशरचा रोल दिला आहे. तो हा रोल समर्थपणे पार पाडत आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या विजयातही कार्तिकनं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली फटकेबाजी निर्णयाक ठरली होती. जागतिक क्रिकेटमधील उत्तम फिनिशर्सपैकी एक असलेल्या कार्तिकचा हा प्रवास सहज झालेला नाही. बायकोनं दिला धोका दिनेश कार्तिकला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा सेटबॅक बसला आहे. विजयचा टीम इंडिया आणि तामिळनाडू टीममधील सहकारी दिनेश कार्तिकची पहिली बायको निकिताबरोबर विजयचं प्रेम जुळलं. कार्तिक आणि निकिता यांचं 2007 साली लग्न झालं होतं. 2012 साली आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान विजय आणि निकिता यांची भेट झाली. त्यानंतर हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. कार्तिकला त्यांच्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर त्याने निकिताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कार्तिक आणि निकिता यांचा घटस्फोट झाला तेव्ही ती गर्भवती होती. कार्तिकशी घटस्फोट झाल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. निकिताला नंतर मुलगा झाला. कार्तिकनं कधीही त्या मुलावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही गाढ झोपेत होता तेव्हा लखनऊच्या खेळाडूनं चारली पाकिस्तानला धूळ धोनीमुळे अडथळा दिनेश कार्तिकनं वयाच्या 19 व्या वर्षी 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कार्तिकनं अगदी सुरूवातीच्या काळातच विकेट किपिंग आणि बॅटींगनं सर्वांना प्रभावित केलं जात होतं. टीम इंडियाचं भविष्य समजला जाणारा कार्तिकच्या करिअरला अचानक ब्रेक लागला. टीम इंडियात महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) आगमन झाले. धोनीच्या धडाक्यापुढे कार्तिक मागे पडला. गेल्या 18 वर्षांमध्ये तो टीम इंडियात अनेक वेळा आत-बाहेर राहिला आहे. या 18 वर्षांमध्ये कार्तिक फक्त 26 टेस्ट, 94 वन-डे आणि 32 टी20 इंटनरनॅशनल खेळला आहे. धोनीसारखा दिग्गज खेळाडू टीममध्ये असल्यानं त्यानं उमेदीची वर्ष भारतीय टीमच्या बाहेरच घालवली आहेत. वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेट कारकिर्दीत आलेल्या अडथळ्यांवर मात करत कार्तिक या सिझनमध्ये आरसीबीचा सर्वात मोठा मॅच विनर बनला आहे. आरसीबीला आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवण्यासाठी त्याचा हा फॉर्म संपूर्ण स्पर्धेत कायम राहण्याची आवश्यकता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, MS Dhoni, RCB

    पुढील बातम्या