मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IPL 2021, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या बॉलरनं विकेट मिळताच केलं असं काही...पाहा VIDEO

IPL 2021, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या बॉलरनं विकेट मिळताच केलं असं काही...पाहा VIDEO

आयपीएलमध्ये (IPL 2021) रविवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) ही प्रतिष्ठेची लढत झाली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॉलरनं केलेलं संतप्त वर्तन सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

दुबई, 27 सप्टेंबर : आयपीएलमध्ये (IPL 2021) रविवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) ही प्रतिष्ठेची लढत झाली. 'प्ले ऑफ' ची दावेदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही टीमला ही मॅच जिंकणे आवश्यक होते. त्यामध्ये अखेर विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं बाजी मारली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॉलरनं केलेलं संतप्त वर्तन सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. देवदत्त पडिक्कल झटपट आऊट झाला. त्यानंतर विराटनं विकेट किपर श्रीकर भरतसोबत आरसीबीला सावरलं. या दोघांनी 8 ओव्हरमध्ये 63 रन काढले होते. मुंबईकडून राहुल चहर (Rahul Chahar) 9 वी ओव्हर टाकण्यासाठी आला होता.

चहरच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विराटनं फोर लगावला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर जोरदार कट शॉट खेळला. त्यावेळी पॉईंटवर उभ्या असलेल्या हार्दिक पांड्यानं कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. विराटनं त्या बॉलवर एक रन काढला. विराटची कॅच सुटल्याची नाराजी चहरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यानंतर पुढच्याच बॉलवर श्रीकर भरतनं सिक्स लगावत चहरच्या जखमेवर मीठ चोळलं.

IPL 2021, MI vs RCB: बाबा आऊट होताच रागावला डिविलियर्सचा मुलगा, ज्युनिअर ABD चा Video Viral

मनासारख्या गोष्टी घडत नसतानाही चहरनं हार मानली नाही. त्यानं पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा भरतला मोठा शॉट खेळण्याचं आमिष दाखवलं. भरत या जाळ्यात सापडला. त्यानं मारलेला उंच बॉल लाँग ऑफला उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवनं पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.

भरत आऊट होतात चहरनं रागानंच या विकेटचं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.

विराटची विकेट न मिळाल्यानं चहर दुर्दैवी ठरला. पण त्यानं भरत आणि विराटची 68 रनची पार्टनरशिप तोडली. या मॅचमध्ये चहरला नंतर कोणतीही विकेट मिळाली नाही. ग्लेन मॅक्सवेलनं रिव्हर्स स्वीपचा वापर करत त्याच्या बॉलिंगवर रन काढले. चहरनं त्याच्या 4 ओव्हर्समध्ये 33 रन देत 1 विकेट घेतली.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians