• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • IPL 2021: पोलार्डची एक चूक ठरली मुंबईला भारी, धोनीला मिळालं विजयाचं गिफ्ट

IPL 2021: पोलार्डची एक चूक ठरली मुंबईला भारी, धोनीला मिळालं विजयाचं गिफ्ट

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) चेन्नई सुपरकडून (Chennai Super Kings) 20 रननं पराभव झाला. या पराभावाला मुंबईचा कॅप्टन कायरन पोलार्डची (Kieron Pollard) चूक कारणीभूत ठरली.

 • Share this:
  दुबई, 20 सप्टेंबर : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची दमदार सुरूवात (IPL 2021 2nd Phase) केली आहे. सीएसकेनं खराब सुरुवातीनंतरही मॅचमध्ये कमबॅक करत मुंबई इंडियन्सचा 20 पननं पराभव केला. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर पोहचली आहे. 'स्टार स्पोर्ट्स' च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये सहभागी असलेल्या दिग्गजांना मुंबईच्या पराभवावर कॅप्टन कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये केविन पीटरसन आणि इराफान पठाण यांचा समावेश आहे. या दोघांनी मुंबईच्या पराभवात पोलार्डची एक चूक निर्णायक ठरल्याचं दावा केला आहे. पोलार्डला मॅचच्या मधल्या टप्प्यात बॉलर्सचा योग्य वापर करता आला नाही. विशेषत: त्याला जसप्रीत बुमराहचा योग्य वापर करता आला नाही, त्यामुळे 4 आऊट 24 असा स्कोअर झालेला असतानाही चेन्नईनं 156 पर्यंत मजल मारली. POINTS TABLE: पीटरसननं सांगितलं की, 'मोईन अली, फाफ ड्यू प्लेसिस, महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना लवकर आऊट झाले होते. त्यामुळे मुंबईकडं चेन्नईला झटपट ऑल आऊट कण्याची पूर्ण संधी होती. मात्र पोलार्डनं बुमराहचा व्यवस्थित वापर केला नाही. त्यानं कृणाल पांड्याचा वापर केला. कृणाललं 10 वी आणि 12 वी ओव्हर टाकली. कृणालनं या दोन ओव्हरमध्ये 13 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं 27 रन दिले. IPL 2021: मुंबईवरील विजयानंतर धोनी खूश, 'या' 2 खेळाडूंना दिलं श्रेय या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सना दोन मोठे धक्के बसले. दुखापतीमुळे रोहित शर्मा खेळू शकला नाही, त्याच्याऐवजी कायरन पोलार्ड टीमचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला. हार्दिक पांड्यादेखील हा सामना खेळला नाही. तसंच अनमोलप्रीत सिंग हा मुंबईकडून पदार्पणाचा सामना खेळला. IPL 2021, MI vs CSK : 23 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण, थेट रोहितचीच जागा घेतली चेन्नईने ठेवलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 136 एवढाच स्कोअर करता आला. सौरभ तिवारीने (Saurabh Tiwary) सर्वाधिक नाबाद 50 रन केले. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीपासूनच वारंवार धक्के लागले. चेन्नईकडून ड्वॅन ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला 2 विकेट मिळाल्या. जॉश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:News18 Desk
  First published: