• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • IPL 2021: कॅप्टन ऋषभ पंतच्या 3 चुकांमुळे दिल्लीनं गमावली हातातील मॅच

IPL 2021: कॅप्टन ऋषभ पंतच्या 3 चुकांमुळे दिल्लीनं गमावली हातातील मॅच

दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पराभवासाठी बॉलर्स जबाबदार असल्याचं मत कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) व्यक्त केलं आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये स्वत: पंतनं केलेल्या 3 चुकांचा फटका टीमला बसला आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 एप्रिल: आयपीएल 2021 मधील (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पराभवासाठी बॉलर्स जबाबदार असल्याचं मत कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) व्यक्त केलं आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये स्वत: पंतनं केलेल्या 3 चुकांचा फटका टीमला बसला आहे. पहिली चूक दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून आऊट झाला आणि पंतची कॅप्टन म्हणून निवड झाली. पंतची कॅप्टन म्हणून ही दुसरीच मॅच होती. टॉस गमावल्यानंतर दिल्लीला पहिल्यांदा बॅटींग करावी लागली. दिल्लीची टीम 3 आऊट 36 अशी संकटात होती. त्यावेळी पंतनं अर्धशतक झळकावत टीमला सावरलं. अर्धशतकानंतर पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. नेमकं त्याचवेळी रियान परागच्या बॉलिंगवर पंतनं एक रन काढण्यासाठी घाई केली. परागनं थेट थ्रो करत त्याला रन आऊट केलं. त्यावेळी 13 वी ओव्हर सुरु होती. पंत आणखी काही काळ मैदानात टिकला असता तर दिल्लीला 25-30 रनचा फायदा झाला असता. दुसरी चूक पंतची दुसरी चूक एक कॅप्टन म्हणून झाली. दिल्लीचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन दिले होते. तो दिल्लीचा सर्वाधिक इकॉनॉमिकल बॉलर होता. तरीही पंतनं त्याला चौथी ओव्हर दिली नाही. अन्य सर्व बॉलर्स महागडे ठरले. अश्विनला चौथी ओव्हर न देणं ही पंतची दुसरी चूक होती. राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऋषभ पंत नाराज, म्हणाला... तिसरी चूक ऋषभ पंतची तिसरी चूक विकेट किपर म्हणून झाली. 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पंतला जयदेव उनाडकतला रन आऊट करण्याची संधी होती. त्यावेळी गडबडीमध्ये पंतला बॉल नीट पकडता आला नाही. त्यानं स्टम्प उडवले मात्र त्यावेळी बॉल त्याच्या हातामध्ये नव्हता. अनुभवी उनाडकतनं ख्रिस मॉरीसला चांगली साथ दिली. त्यानंतर मॉरीसनं 4 सिक्सच्या मदतीनं 36 रन करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
  Published by:News18 Desk
  First published: