IPL 2020 : राजस्थानचे दिग्गज अपयशी, पण मुलांनी करून दाखवलं, हैदराबादला धूळ चारली

IPL 2020 : राजस्थानचे दिग्गज अपयशी, पण मुलांनी करून दाखवलं, हैदराबादला धूळ चारली

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात राजस्थान (Rajasthan Royals)ची टीम पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. बटलर, स्टोक्स आणि स्मिथ यांच्यासारखे दिग्गज अपयशी ठरले असताना राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी राजस्थानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.

  • Share this:

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात राजस्थान (Rajasthan Royals)ची टीम पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. बटलर, स्टोक्स आणि स्मिथ यांच्यासारखे दिग्गज अपयशी ठरले असताना राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी राजस्थानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. हैदराबाद (Sunrisers Hyderabad)ने ठेवलेल्या 159 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल तेवतियाने 28 बॉलमध्ये नाबाद 45 रन केले, तर रियान परागही 26 बॉलमध्ये 42 रनवर नाबाद राहिला.

हैदराबादने दिलेलं लक्ष्य गाठताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. बेन स्टोक्स, जॉस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ हे स्कोअरबोर्डवर फक्त 26 रन असतानाच माघारी परतले होते. तरीही राजस्थानने खिंड लढवली. हैदराबादकडून खलील अहमद आणि रशीद खानने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

या मॅचमध्ये हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण संपूर्ण इनिंगमध्ये हैदराबादच्या बॅट्समनना संघर्ष करावा लागला. मनिष पांडेने 58 रन तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 48 रन केले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

लागोपाठ 4 मॅच गमावल्यानंतर राजस्थानचा या मॅचमध्ये विजय झाला आहे. यंदाच्या मोसमात राजस्थानने 7 पैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने 7 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: October 11, 2020, 7:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या