Home /News /news /

IPL 2020 : सिराजने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

IPL 2020 : सिराजने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

आयपीएल (IPL 2020) मध्ये बँगलोर (RCB)चा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये मोहम्मद सिराजने भेदक स्पेल टाकला.

    अबु धाबी, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये बँगलोर (RCB)चा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये मोहम्मद सिराजने भेदक स्पेल टाकला. आयपीएलमध्ये लागोपाठ 2 मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम सिराजने केला आहे. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता कोलकात्याच्या 3 बॅट्समनना माघारी धाडलं. याचसोबत आयपीएलमध्ये दोन ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रमही सिराजच्या नावावर झाला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने या मॅचमध्ये शाहबाज नदीमच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली. सिराजनेही विराटने दिलेल्या या संधीचं सोनं केलं. मॅचची दुसरी ओव्हर टाकताना सिराजने राहुल त्रिपाठीची विकेट घेतली, यानंतर पुढच्याच बॉलला त्याने नितीश राणाला पहिल्याच बॉलवर माघारी धाडलं आणि एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन मेडन ओव्हर टाकली. यानंतर चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सिराजने टॉम बॅन्टनचीही विकेट घेतली. अखेर सिराजच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला दिनेश कार्तिकने 1 रन काढली. सिराजच्या या ओव्हरमध्ये कोलकात्याला दोन रन काढता आल्या. मोहम्मद सिराजच्या या भेदक बॉलिंगमुळे कोलकात्याची अवस्था 32 रनवर 5 विकेट अशी झाली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या