IPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय

अखेर त्याची बॅट तळपळी स्मिथच्या धावांच्या जोरावर राजस्थाननं एकहाती सामना जिंकला. स्मिथनं 48 चेंडूत 59 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 07:45 PM IST

IPL 2019 : राजस्थानला कॅप्टन स्मिथ पावला, मुंबईवर 5 विकेटनं विजय

जयपूर, 20 एप्रिल: प्ले ऑफ आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या राजस्थानला नवा कर्णधारला लाभला आणि आपला तिसरा विजय त्यांनी नोंदवला. कर्णधार स्टीव्ह स्मिथनं चेंडूत मॅचविनिंग खेळी करत आपल्या संघाला तिसरा विजय मिळवून दिला.तब्बल एक वर्ष चेंडूत फेरबदल करण्यामुळं बाहेर असलेला स्मीथ पहिल्याच्या बाराव्या हंगामात क्रिकेट खेळत असून, आज अखेर त्याची बॅट तळपळी स्मिथच्या धावांच्या जोरावर राजस्थाननं एकहाती सामना जिंकला. स्मिथनं 48 चेंडूत 59 धावा केल्या. त्याला युवा रियाननं चांगली साथ दिली. रियान परागनं 43 धावा केल्या


Loading...


दरम्यान 162 धावांचा पाठलाग करत असताना, राजस्थानच्या संघान आपली पहिली विकेट लवकर गमावली. मुंबईचा फिरकीराहुल चहरनं सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहरनं अजिंक्य रहाणेला केवळ 12 धावांत बाद केलं. त्यानंतर आपल्या एकाच ओव्हरमध्ये चांगल्या लयीत असलेल्या संजू सॅमसनला 35 धावांवर बाद झाला. तर, बेन स्टोक्सला आपल्या पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडताच बाद बाद झाला.मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईला 161 धावांवर रोखले. जोफरा आर्चरनं हार्दिकला दोनवेळा दिलेल्या जीवनदानामुळं मुंबई इंडियन्सनं राजस्थानला धावांचे आव्हान दिले. हार्दिकनं 15 चेंडूत 22 धावा केल्या. मुंबईकडून सलामीला येणारा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असताना, कर्णधार रोहित शर्मा आहे. श्रेयस गोपाळच्या फिरकीपुढं रोहितनं आपली विकेट टाकली आणि रोहित 5 धावांवर बाद झाला.

मात्र, पुढच्याच षटकात डी कॉकने सर्व दडपण झुगारून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजाची धुलाई केली. डी कॉकने कुलकर्णीच्या त्या षटकात सलग तीन चौकार व एक षटकारासह 19 धावा चोपल्या. डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. डी कॉकने 34 चेंडूंत अर्धशतक झळकावले.VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 20, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...