सुनिल गावस्करांच्या हस्ते मिळाला राहुल द्रविडला हा ‘सन्मान’

सुनिल गावस्करांच्या हस्ते मिळाला राहुल द्रविडला हा ‘सन्मान’

द्रविडने भारतीय क्रिकेटची खूप सेवा केली आहे. तो या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी योग्यच आहे

  • Share this:

नवी दिल्ली, ०१ नोव्हेंबर २०१८- भारताचा माजी कर्णधार आणि अंडर १९ आणि इंडिया एचा प्रशिक्षक राहुल द्रविड गुरूवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी झाला. क्रिकेट जगतातील महान व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.आतापर्यंत चार भारतीय खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. द्रविड या यादीत पाचव्या स्थानी आहे.

ग्रीनफील्ड स्टेडिअममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आज भारताने पाचवा सामना खेळला. हा सामना सुरू होण्यापूर्वी द्रविडला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार द्रविडला प्रदान करण्यात आला. यावेळी गावस्कर यांनी द्रविडला आयसीसी हॉल ऑफ फेमची प्रतिकात्मक कॅप दिली.

गावस्कर यांनी द्रविडला शुभेच्छा देत म्हटले की, 'द्रविडने भारतीय क्रिकेटची खूप सेवा केली आहे. तो या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी योग्यच आहे. द्रविडला याच वर्षी जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगसोबत आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी करून घेतले होते.'

भारताकडून याआधी बिशन सिंह बेदी, कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना २००९ मध्ये हॉल ऑफ फेममध्ये सहभागी करून घेतले होते. यानंतर २०१५ मध्ये अनिल कुंबलेलाही हा सन्मान मिळाला. आता २०१८ मध्ये राहुल द्रविड सहभागी झाला. आता लवकरच सचिन तेंडुलकरही या ग्रुपमध्ये सहभागी होईल.

First published: November 1, 2018, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading