मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IND vs ENG : 15 ऑगस्टच्या दिवशी लॉर्ड्सवर लढाई, ब्रिटीशांचा बदला घेण्याची टीम इंडियाला संधी

IND vs ENG : 15 ऑगस्टच्या दिवशी लॉर्ड्सवर लढाई, ब्रिटीशांचा बदला घेण्याची टीम इंडियाला संधी

लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs England 2nd Test) 15 ऑगस्ट आहे. ही भारताची इंग्रजांवरील सर्वात मोठ्या विजयाची तारीख आहे. टीम इंडियानं या दिवसाची प्रेरणा घेत खेळ करण्याची गरज आहे.

  • Published by:  News18 Desk
लॉर्ड्स, 15 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या रंगतदार वळणावर आली आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 364 रन काढले. केएल राहुलचं (KL Rahul) शतक हे भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरले. त्याला उत्तर देताना इंग्लंडन कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) नाबाद शतकी खेळीमुळे 391 रनपर्यंत मजल मारली. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 27 रनची आघाडी घेतली असून सध्या लॉर्ड्स टेस्टचं पारडं दोन्ही बाजूला समान आहे. पहिला दिवस भारताचा इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकत ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्यासाठी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय यशस्वी झाला नाही. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 3 आऊट 276 रन केले. केएल राहुलचं शतक आणि रोहित शर्माचे (Rohit Sharma) 83 रन या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं. दुसरा दिवस बरोबरीत पहिल्या दिवसाच्या खेळानंतर टीम इंडिया 450 रनपर्यंत मजल मारेल असा अंदाज होता. मात्र इंग्लंडच्या बॉलर्सनी तो उद्देश सफल होऊ दिला नाही. टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी आणखी फक्त 88 रन जोडता आले. त्यामुळे भारताची पहिली इनिंग 364 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर मोहम्मद सिराजनं इंग्लंडला सलग दोन बॉलवर धक्के दिले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडनं 3 आऊट 119 रन केले. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ बरोबरीत सुटला. तिसऱ्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व इंग्लंडनं तिसऱ्या दिवशी 272 रन जोडले. कॅप्टन जो रूटनं नाबाद 180 रनची खेळी केली. नॉटिंघम टेस्टमध्ये 9 विकेट्स घेणाऱ्या बुमराहाला एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडनं तिसऱ्या दिवशी 27 रनची महत्त्वाची आघाडी मिळवली. IND vs ENG : बुमराहनं टाकले 1, 2 नाही तर तब्बल 13 नो बॉल! शेवटच्या ओव्हरमध्ये तर हद्द झाली... 15 ऑगस्टला मोठी लढाई लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी 15 ऑगस्ट आहे. ही भारताची इंग्रजांवरील सर्वात मोठ्या विजयाची तारीख आहे. टीम इंडियानं या दिवसाची प्रेरणा घेत खेळ करण्याची गरज आहे. भारतीय टीमनं दुसऱ्या इनिंगमध्ये 100 ओव्हर्सपेक्षा जास्त बॅटींग केली तर इंग्लंडवर 300 रनची आघाडी घेता येईल. त्यानंतर इंग्लंडला पाचव्या दिवशी 300 पेक्षा जास्त रनचं टार्गेट पूर्ण करणे अवघड होणार आहे. त्यामुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये ब्रिटीशांच्या पराभवाचा पाया रचण्याची संधी 15 ऑगस्ट रोजी टीम इंडियाला आहे.
First published:

Tags: Cricket news, India vs england

पुढील बातम्या