लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट लॉर्ड्समध्ये (India vs England Lords Test) सुरु झाली आहे. टीम इंडियानं इंग्लंडमध्ये 2007 नंतर टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. त्यामुळे ही सीरिज जिंकून 14 वर्षांचा वनवास संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीकाकारांमध्ये वाढ झाली आहे. विराटच्या कॅप्टनसीवर प्रश्न विचारण्यात येत आहेत. विराटच्या टीकाकारांना टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) चोख उत्तर दिलं आहे.
जडेजा विराटच्या कॅप्टनसीमध्ये अंडर 19 वर्ल्ड कप देखील खेळला आहे. 2008 साली झालेला हा वर्ल्ड कप विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं जिंकला होता. त्यामुळे गेल्या 13 वर्षांपासून जडेजाला विराटच्या कॅप्टनसीचा अनुभव आहे. या कालावधीमध्ये विराट कोहली एक कॅप्टन म्हणून परिपक्व झाला आहे, असं मत जडेजानं व्यक्त केलं आहे.
विराट नेहमी सकारात्मक
जडेजानं 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीच्या कॅप्टनसीवर मत व्यक्त केलं आहे. 'मी त्याच्यासोबत अंडर 19 पासून खेळतोय. तो आता परिपक्व झाला आहे. तसंच नेहमी सकारात्मक असतो. कोणत्याही टीमविरुद्ध मॅच असली तरी ती जिंकण्याचा विराटचा प्रयत्न असतो.
कोणतीही मॅच असो वा सीरिज तो कायम प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे टीममध्ये वातावरण चांगले राहते. ही त्याच्या कॅप्टनसीची सर्वात जमेची बाजू आहे. तो मैदानावर कायम आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतो.'
IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला; भारतीय टीममध्ये एक बदल, पाहा Playing11
आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने पुढील महिन्यात होणार आहेत. आयपीएलमुळे टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीला मदत होईल असं जडेजानं सांगितलं. 'इंग्लंड सीरिजनंतर आयपीएल होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीची ही चांगली संधी असेल. आम्ही आयपीएल आणि वर्ल्ड कप दोन्ही यूएईमध्ये खेळणार आहोत. तेथील मैदानांची आम्हाला मदत मिळेल.' असा विश्वास जडेजानं यावेळी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Virat kohli