India vs Australia 2nd Test, Day 2- ३२० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचा संघ बाद करण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य

India vs Australia 2nd Test, Day 2- ३२० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचा संघ बाद करण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य

जसा दिवस पुढे सरकेल, पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे.

  • Share this:

पर्थ, १५ डिसेंबर २०१८- पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आहेत. पर्थच्या पिचनुसार ही धावसंख्या चांगली आहे. आता खेळाच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं प्लॅनिंग उरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकरात लवकर बाद करणं हेच असेल.

तसं झालं नाही तर टीम इंडियासाठी दुसरा कसोटी सामना जिंकणं कठीण होईल. किमान ३२० धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा उर्वरित संघ गारद करण्याचं लक्ष्य भारताचं असणार आहे. कारण जसा दिवस पुढे सरकेल पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे.

टीम इंडियाने जर ऑस्ट्रेलियाच्या संघाला लवकर बाद केले तर भारताच्या सलामीच्या जोडीला धावा करणं फार आवश्यक आहे. मुरली विजय आणि के.एल. राहुल यांना उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. तर एडिलेड कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही जबाबदारीपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे. तसेच पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर भारताची खरी मदार असणार आहे.

पर्थ कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दिवशी ६ गडी गमावत २७७ धावा केल्या. खेळ संपेपर्यंत कर्णधार टिम पेन १६ आणि कमिंस (११) खेळत होते.

ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळल्यामुळे त्यांनी २७७ पर्यंत सहज मजल मारता आली. एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८)  धावा करुन बाद झाला.  भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर इशांत शर्मा आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

First published: December 15, 2018, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading