Live Cricket Score, India vs Australia 2nd Test: लंचपर्यंत ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, भारतीय गोलंदाजांवर दबाव

Live Cricket Score, India vs Australia 2nd Test: लंचपर्यंत ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, भारतीय गोलंदाजांवर दबाव

विराटने आतापर्यंत चार जलदगती गोलंदाजांना खेळवले आहे. मात्र एकाही गोलंदाजाला अपेक्षित यश मिळालेलं नााही.

  • Share this:

पर्थ, १४ डिसेंबर २०१८- दुसऱ्या कसोटी सामन्याचं पहिलं सत्र पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहीलं. भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा केला मात्र ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच (२८) आणि मार्कस हॅरिस (३६) या सलामीच्या जोडीने संयमी खेळ खेळत लंक ब्रेकपर्यंत स्कोअर एकही गडी न गमावत ६६ पर्यंत नेला. आतापर्यंत २६ षटकांचा खेळ झाला आहे. विराटने आतापर्यंत चार जलदगती गोलंदाजांना खेळवले आहे. मात्र एकाही गोलंदाजाला अपेक्षित यश मिळालेलं नााही. आतापर्यंत फक्त सहा टक्के चेंडूच स्टंप्सवर लागले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने २३ टक्के चेंडू सोडले आहेत. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यात ३२ टक्के चेंडू सोडले होते. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने मैदानात आपले पाय चांगलेच रोवले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यातील दुसरा सामना आजपासून पर्थ स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीने संघात दोन बदल केले. रोहित शर्मा आणि आर. अश्विनच्या जागी हनुमा विहारी आणि उमेश यादव यांना संघात सहभागी केले आहे. दुसरा सामना जिंकत भारत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने एडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

एडिलेड मैदानात टीम इंडियासाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि आर. अश्विनची अनुपस्थिती भारतासाठी चिंताग्रस्त विषय आहे. कमरेच्या दुखापतीमुळे आणि रोहित क्षेत्ररक्षण करताना पाठीवर पडल्यामुळे दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ते खेळणार नाही. भारतीय संघात उमेश यादव, हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोहलीच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३०० पर्यंतच्या धावा केल्या तरीही जर गोलंदाज २० गडी बाद करु शकले तर जिंकणं अशक्य नाही. या सामन्यातून हनुमाला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे जोश हेजलवुड, मिशेच स्टॉर्क, नाथन ल्योनसारखे गोलंदाज आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन संघाचं मुळ ध्येय हे पुजाराला लवकरात लवकर बाद करण्याकडे असेल.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एडिलेडमध्ये सपशेल निराशा केली. ट्रेविस हेड आणि शॉर्न मार्श सोडून इतर कोणत्याही फलंदाजांनी ४० हून अधिक धावा केल्या नाहीत. अशा परिस्थितीत १-१ अशी बरोबर करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचला मैदानावर अधिक काळ फलंदाजी करावी लागेल यात काही शंका नाही.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

First published: December 14, 2018, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading