Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारत (११२/ ५) पराभवाच्या छायेत

Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारत (११२/ ५) पराभवाच्या छायेत

सहाव्या विकेटसाठी ऋषभ पंत (९) आणि हनुमा विहारी (२४) खेळत आहेत.

  • Share this:

पर्थ, १७ डिसेंबर २०१८- भारताचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताला सामना जिंकण्यासाठी १७५ धावांची गरज आहे. सहाव्या विकेटसाठी ऋषभ पंत (९) आणि हनुमा विहारी (२४) खेळत आहेत. या दोघांनी उद्या शेवटच्या दिवशी चांगली भागीदारी केली तर भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा पल्लवीत होतील. अन्यथा हा सामना भारताच्या हातातून गेल्यातच जमा आहे.

भारताने केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या विकेट गमावल्या. रहाणेने ३० तर विजयने २० धावांचं योगदान दिलं. भारताने ज्या पाच विकेट गमावल्या त्यातील जोश हेजलवुड आणि नाथन लायनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्कला एक विकेट मिळाली.

पुन्हा एकदा टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार गॅरी कर्स्टन, या खेळाडूंसोबत असेल स्पर्धा

मोहम्मद शमी (६/ ५६) आणि जसप्रीत बुमराह (३/ ३९) च्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर थांबवला. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजाने ७२, टिम पेनने ३७ आणि एरॉन फिंचने २५ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ४३ धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर २८६ धावांचं लक्ष्य उभं केलं.

Ind vs Aus- या कारणांमुळे पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव पक्का

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर संपला. भारताकडून इशांत शर्माने ४, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियासाठी एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८), शॉन मार्श (४५), पेनने (३८) धावा केल्या.

Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- लंचनंतर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के, शमीनेच घेतल्या दोन्ही विकेट, पेन- फिंच बाद

पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आहेत. पर्थच्या पिचनुसार ही धावसंख्या चांगली आहे. कारण जसा दिवस पुढे सरकेल पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

First published: December 17, 2018, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading