Live Cricket Score, India vs Australia 2nd test 3rd day- भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे आऊट

Live Cricket Score, India vs Australia 2nd test 3rd day- भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे आऊट

टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात धक्का बसला.

  • Share this:

पर्थ, १६ डिसेंबर २०१८- तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी थोडी निराशाजनक झाली. १७२/ ३ च्या पुढे खेळण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात धक्का बसला. नाथन लायनच्या चेंडूवर रहाणे यष्टीरक्षक पेनकरवी बाद झाला. रहाणे ५१ धावा करुन बाद झाला. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीवर भारताने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली धावसंख्या उभारली होती.

दुसरा दिवस संपेपर्यंत भारताने विराट- रहाणेच्या जोरावर १७२ धावा केल्या होत्या. दोघांनी मिळून ९० धावांची भागीदारी केली. सध्या भारत ऑस्ट्रेलियापासून१३८ धावा पिछाडीवर असून ७ गडी बाकी आहेत. त्यामुळे भारताला चांगली आघाडी घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या ८ धावांमध्ये दोन विकेट गमावल्या. अशावेळी कोहली आणि पुजाराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि खेळपट्टीला अनुसरुन ८० धावा केल्या. या जोडीला स्टार्कने तोडलं. लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फ्लिक करण्याच्या नादात पुजाराने टिम पेनला कॅच दिली. पुजाराने २४ धावा केल्या कोहली- पुजाराने ७४ धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर संपला. भारताकडून इशांत शर्माने ४, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियासाठी एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८), शॉन मार्श (४५), पेनने (३८) धावा केल्या.

पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आहेत. पर्थच्या पिचनुसार ही धावसंख्या चांगली आहे. कारण जसा दिवस पुढे सरकेल पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

First published: December 16, 2018, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading