Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे १६६ धावांची आघाडी

Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे १६६ धावांची आघाडी

खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा ४० धावांवर आणि अजिंक्य रहाणे १ धावावर खेळत होते.

  • Share this:

एडिलेट, ०८ नोव्हेंबर २०१८- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने ६१ षटकात तीन गडी गमावत १५१ धावा केल्या एकून भारताकडे १६६ धावांची आघाडी आहे. खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा ४० धावांवर आणि अजिंक्य रहाणे १ धावावर खेळत होते. नाछन लायनने विराट कोहलीला बाद करुन भारताला झटका दिला. पुजारा आणि कोहलीने ७१ धावांची भागीदारी केली होती. कोहलीला ३४ धावावंर एरॉन फिंचने झेल बाद केले. त्याने १०४ चेंडूत तीन चौकार लगावले. या मैदानावर चौथ्या दिवशी २५० धावांचं लक्षही मोठं मानलं जातं.

पहिल्या डावाच मिळालेल्या १५ धावांच्या आघाडीने टीम इंडियाने आत्मविश्वासाने दुसऱ्या डावाला सुरूवात केली. सलामीवीर जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. भारताकडे १०० धावांची लीड आहे. पहिल्यांदा विजय आणि राहुल यांनी ५० धावांची भागीदारी केली. गेल्या ११ सामन्यांमध्ये त्यांनी पहिल्यांदा ५० धावांची भागीदारी केली. मुरली विजयला (१८) स्टार्कने स्लिपमध्ये हँड्सकॉम्बकरवी बाद केले. त्यानंतर केएल राहुलही (४३) बाद झाला. त्याला हेजलवूडने पेनकरवी झेल बाद केले.

Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day, ऑस्ट्रेलिया २३५ ला ऑला आऊट, मात्र पुन्हा सुरू झाला पाऊस

ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांचा पहिला डाव २३५ धावांवर ऑल आऊट झाले. भारताने पहिल्या डावात २५० धावा केल्या होत्या. यामुळे टीम इंडियाकडे १५ धावांची लीड होती. एडिलेड ओवल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने (७२) सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे उशिराने सुरू झाला. यानंतर शुक्रवारी नाबाद असलेले हेड आणि मिचेल स्टार्कने (१५) २७ धावा करुन संघाला २०४ धावांपर्यंत पोहोचवले.

यानंतर जसप्रीत बुमराहने ऋषभ पंतकरवी स्टार्कला बाद केले. दरम्यान, पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर हेडने नाथन ल्योनच्या (२४) साथीने ३१ धावांची भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद शमीने हेडला बाद केले. शमीने २३५ च्या धावसंख्येवर हेडला ऋषभ पंतकडून झेल बाद केले. यानंतर शमीने दुसऱ्याच चेंडूवर जोश हेजलवूडलाही बाद करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑल आऊट केले.

Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day- टी ब्रेकपर्यंत भारताकडे १०० धावांची लीड, कोहली- पुजारा मैदानात

ल्योन या डावाद नाबाद राहिला. भारताकडून अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी ३ गडी बाद केले तर इशांत आणि शमीने प्रत्येकी २ गडी बाद केले. आता शमी जेव्हा दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला येईल तेव्हा त्याच्याकडे हॅट्रीक करण्याची संधी असेल. भारताने चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीवर २५० धावांचा पल्ला गाठला.

भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.

First published: December 8, 2018, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading