VIDEO- कोच रवी शास्त्रीने असं केलं सेलिब्रेशन, बीअर पीत आले सर्वांसमोर

VIDEO- कोच रवी शास्त्रीने असं केलं सेलिब्रेशन, बीअर पीत आले सर्वांसमोर

याआधी भारताने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकली नाही. जर चौथा सामना भारत जिंकला तर भारत ही मालिका जिंकत इतिहास रचेल.

  • Share this:

मेलबर्न, ३१ डिसेंबर २०१८- टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला रविवारी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात १३७ धावांनी मात देत ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडेल असं वाटत होते, मात्र टीम इंडियाने काही चेंडूतच ऑस्ट्रेलियाचे उरलेले दोन गडी बाद करण्याचा निश्चय केला होता. अखेर फक्त २७ चेंडूत टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवला. जिंकल्यानंतर मैदानावर आणि मैदाना बाहरे भारतीय संघ आणि त्यांचे चाहते आनंद साजरा करताना दिसले.

भारत आर्मी हा समुह अनेकदा भारतीय संघाला परदेशी दौऱ्यात पाठिंबा देताना दिसतो. हा समुहही फार आनंदी होता. त्यांनी अनोख्या पद्धतीने टीम इंडियाचं स्वागत केलं. संघाची बस हॉटेलच्या दारापाशी पोहोचली तेव्हा भारत आर्मीने त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं.

बिअर पिताना दिसले रवी शास्त्री-

बस हॉटेलच्या समोर आली, तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हातात बिअरची बाटली घेऊन बसमधून उतरताना दिसले. त्यांच्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली बाहेर पडला. विराटने हॉटेलमध्ये जाण्याआधी त्या चाहत्यांसोबत काही वेळ ठेका धरला. या धमाकेदार स्वागतामुळे भारतीय संघही चांगलाच खूश झाला. हार्दिक पांड्याने तर त्यांच्यासोबत भांगडाही केला.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकली नाही. जर चौथा सामना भारत जिंकला तर भारत ही मालिका जिंकत इतिहास रचेल.

First published: December 31, 2018, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading