...म्हणून विराटने जाणिवपूर्वक रोखलं रोहित शर्माचं शतक? संघाला पडलं असतं भारी

...म्हणून विराटने जाणिवपूर्वक रोखलं रोहित शर्माचं शतक? संघाला पडलं असतं भारी

सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चाहत्यांनी कोहलीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

  • Share this:

मेलबर्न, २८ डिसेंबर २०१८- मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. भारताने पहिल्या डावात ४४३ धावा करत डाव घोषित केला. पुजाराने शतकी खेळी खेळली. तर विराट कोहली, मयंक अग्रवालने अर्धशतक ठोकले. कसोटी सामन्यात अनेकदा टीकांना सामारं जावं लागणाऱ्या रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले. त्याने नाबाद ६३ धावा केल्या. रोहितचा त्या दिवसाचा फॉर्म पाहता तो सहज शतक झळकावू शकला असता. मात्र कर्णधार कोहलीने जडेजा बाद झाल्यावर डाव घोषित केला. सोशल मीडियावर चाहत्यांनी कोहलीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. रोहितच्या चाहत्यांच्या मते तो सहज शतक ठोकू शकला असता. मात्र विराटने डाव घोषित करण्याचंही एक खास कारण आहे.

विराटने संघाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला. रोहित शर्मासोबत शमी, इशांत आणि बुमराह फलंदाजीला उतरले असते. हे तीनही फलंदाज रोहितसोबत खेळते तर खूप वेळ वाया गेला असता. विराटला कोणत्याही परिस्थितीत खेळ संपायच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात उतरवायचे होते. विराटची रणनीती पाहता त्याला ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन द्यायचा आहे. मात्र मेलबर्नच्या खेळपट्टीवर फॉलोऑन देणं थोडं कठीण आहे. इतर खेळपट्टींच्या मानाने या खेळपट्टीवर खेळणं जास्त सोपं आहे. यासाठी भारतीय संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल.

रोहितसाठी खास होतं अर्धशतक

भलेही रोहित शतकी खेळी खेळू शकला नाही, पण त्याच्यासाठी नाबाद ६३ धावा करणं फार खास होतं. रोहितने २०१५ नंतर पहिल्यांदा आशियाच्या बाहेर अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर रोहितचे हे दुसरे अर्धशतक आहे. तसेच हे पहिल्यांदा घडलं की अर्धशतक लगावता रोहितने षटकार लगावला नाही.

'बॉक्सिंग डे'ने मेलबर्न क्रिकेट मैदानात सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ -१ अशा बरोबरीत आहेत. या सामन्यातील विजयामुळे फक्त मालिकेत स्थान घट्ट होणार असं नाही तर २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला ही मानसिकता खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल.

एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने सामना जिंकला तर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने जसंच्या तसं उत्तर देत मालिकेत आपलं अस्तित्व टिकवून धरलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.

First published: December 28, 2018, 9:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading