दुसरी टी२० हरले तर टीम इंडियाचे होतील हे ३ तोटे

टीम इंडियाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत ३-० हरवले होते. त्यानंतर पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

  • Share this:

ब्रिसबेनमध्ये खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा ४ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकण्यात खंड पडला. टीम इंडियाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत ३-० हरवले होते. त्यानंतर पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरा टी२० सामना उद्या २३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे होणार आहे. टीम इंडियाला हा सामना सांभाळून खेळावा लागणार आहे. कारण हा सामना हरले तर संघाला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

पहिला टी२० सामना हरल्यानंतर टी२० क्रमवारीत भारताचे दोन गुणांनी नुकसान झाले आहे. सध्या भारताच्या खात्यात १२५ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाला २ गुणांचा फायदा झाला आहे. त्यांचे एकूण गुण १२० झाले असून ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

अशात टीम इंडिया दुसरा टी२० सामना हरते तर टी२० रँकिंगमध्ये दोन्ही संघांच्या गुणात फारसं अंतर राहणार नाही. तिसरा टी२० सामनाही भारत हरल तर रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आणि भारत सरळ तिसऱ्या स्थानावर फेकला जाईल. त्यामुळे भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ६ टी२० मालिका खेळल्या आहेत. त्यातील फक्त एक मालिका ते जिंकले आहेत. तर भारताने ३ मालिका जिंकल्या आहेत आणि दोन मालिका अनिर्णित राहिल्या. भारताला टी२० मधला आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर २३ नोव्हेंबरचा दुसरा सामना जिंकणं फार आवश्यक आहे.

दुसरा सामनाही ऑस्ट्रेलिया जिंकली तर टी२० ची मालिका ऑस्ट्रेलियाच्या नावावर होईल. याआधी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची टी२० मालिका कधीही जिंकली नाही. त्यामुळे ही मालिका जिंकण्याचा ते सर्वोतोपरी प्रयत्न करतील.

भारतानेही आतापर्यंत ऑस्ट्रेलियात संपूर्ण दौरा आपल्या नावावर केलेला नाही. सध्याची ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या मानाने कमकूवत दिसते. त्यामुळे टी२०, एकदिवसीय आणि कसोटी या तीनही मालिका भारत आपल्या नावावर करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र टी२० चा दुसरा सामना भारत हरला तर हे स्वप्नही भंगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 06:29 PM IST

ताज्या बातम्या