केएल राहुलने बॅटिंगदरम्यान उचलला बॉल, टिम पेनने घेतला आक्षेप

केएल राहुलने बॅटिंगदरम्यान उचलला बॉल, टिम पेनने घेतला आक्षेप

टीम पेनने याबद्दल बाजूलाच उभ्या असलेल्या खेळाडूशी चर्चा केली. त्यानंतर तो पंचांशी बोलायला गेला.

  • Share this:

एडिलेड, १० डिसेंबर २०१८- ऑस्ट्रेलियाचा संघ सामना जिंकण्यासाठी कोणत्याही पर्यायाचा वापर करु शकतो हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. असंच काहीसं एडिलेड कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाहायला मिळालं.


फलंदाजी करताना केएल राहुलने चेंडू उचलला म्हणून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार भलताच रागावलेला दिसला. कर्णधार टिम पेनने राहुलची तक्रार पंचांकडे केली. पेनला ‘हँडलिंग ऑफ द बॉल’ अंतर्गत राहुलला बाद करायचे होते. तसा विचारही त्याच्या मनात होता. म्हणूनच पेन पंचांकडे राहुलची तक्रार करायला गेला होता.


१८ व्या षटकात राहुल फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला लागून राहुलच्या पायापाशीच थांबला. तेव्हा राहुलने तो चेंडू उचलून गोलंदाज नाथन लायनला दिला. नेमकी हीच गोष्ट कर्णधार पेनला पटली नाही. याबद्दल त्याने बाजूलाच उभ्या असलेल्या खेळाडूशी चर्चा केली. त्यानंतर तो पंचांशी बोलायला गेला.
ऑस्ट्रेलियाने ३२३ धावांचं लक्ष्य पूर्ण करताना २६० धावांवर ९ गडी गमावले. एडिलेटमध्ये टीम इंडिया आता इतिहास रचण्यापासून फक्त १ विकेट दूर आहे. या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार होणार आहे.


VIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 10:34 AM IST

ताज्या बातम्या