ऐकावं ते नवलच! टीम इंडियातून डच्चू मिळाल्याचा 'या' खेळाडूला झाला फायदा

ऐकावं ते नवलच! टीम इंडियातून डच्चू मिळाल्याचा 'या' खेळाडूला झाला फायदा

गेल्या वर्षभरापासून भारतीय संघात त्या खेळाडूला संधी मिळाली नव्हती. दरम्यान याचा आपल्याला फायदा झाल्याचं खेळाडूनं म्हटलं.

  • Share this:

त्रिनिदाद, 20 ऑगस्ट : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने संघातून बाहेर राहिल्यानं गोलंदाजीत सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे. गोलंदाजीत झालेल्या सुधारणेमुळं आत्मविश्वास वाढला आहे. यामुळं आशा आहे की विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. सराव सामन्यात विंडीज ए विरुद्ध उमेश यादवने 19 धावा देत 3 गडी बाद केले होते. तो म्हणाला की, विदर्भ क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांनी पुन्हा गोलंदाजीत लय पकडण्यास मोलाची मदत केली.

सराव सामन्यानंतर उमेश यादव म्हणाला की, मी विदर्भ क्रिकेट अकादमीत गेलो आणि सुब्रतो बॅनर्जी यांचं मार्गदर्शन घेतलं. माझ्या गोलंदाजीवर त्यांचं मत विचारलं तेव्हा गोलंदाजीच्या लाइन आणि लेंथवर काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. जास्त क्रिकेट खेळल्यामुळं लाइन आणि लेंथ बिघडली होती असंही उमेश यादवनं म्हटलं.

मी बऱ्याच काळानंतर सराव सामन्यात खेळत आहे. इथं एक सामना इंडिया एसाठी खेळलो आहे. खेळपट्टी जास्त वेगळी नाही आणि इथं स्विंगसुद्धा होत आहे. सराव सामन्यात माझं लक्ष लेंथ अचूक ठेवण्यावर होतं. मी ते करू शकलो असंही उमेश यादव म्हणाला.

उमेश यादवने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर घरेलू स्पर्धा आणि आयपीएलमध्येही त्यानं भाग घेतला होता. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर रणजी ट्रॉफीत खेळलो आणि जिंकलो. त्यानंतर आयपीएलसुद्धा खेळलो. गेल्या अडीच महिन्यात मी चुका सुधारण्यावर आणि लय पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

भारतीय संघात सध्या वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. भुवनेश्वर कुमार, बुमराह, मोहम्मद शमी हे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्याबद्दल विचारले असता उमेश यादव म्हणाला की, जर तुम्हाला माहिती आहे की, एकापाठोपाठ तुम्ही कसोटी सामने खेळणार आहात तेव्हा तुम्हाला बेंच स्ट्रेंथची गरज असणार आहे. सर्व गोलंदाजांना माहिती आहे की आपली स्पर्धा आहे आणि सर्वांना संधी मिळणार आहे. यात जो चांगला खेळेल त्यालाच संधी मिळेल.

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 06:03 PM IST

ताज्या बातम्या