मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IND vs SA : मोहम्मद शमीची चूक बुमराहनं सुधारली, आफ्रिकेला मोठा धक्का

IND vs SA : मोहम्मद शमीची चूक बुमराहनं सुधारली, आफ्रिकेला मोठा धक्का

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवसाला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाला पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकण्याची संधी आहे.

सेंच्युरियन, 30 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवसाला सुरूवात झाली आहे. पाचव्या दिवसावर पावसाचं सावट असलं तरी सकाळच्या सेशनमध्ये चांगला सूर्यप्रकाश असल्यानं खेळ सुरू झाला आहे. सेंच्युरियनवर टेस्ट जिंकणारी पहिली आशियाई टीम होण्यासाठी टीम इंडियाला खेळ सुरू झाला तेव्हा 6 विकेट्सची आवश्यकता होती.

दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन डीन एल्गारनं (Dean Elgar) आणि तेम्बा बावूमा (Temba Bavuma) या जोडीनं सकाळी खेळ सुरू केला. चौथ्या दिवशी 52 रन काढून खेळत असलेल्या एल्गारने पाचव्या दिवशी देखील आत्मविश्वासानं सुरूवात केली. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) बॉलवर एल्गारला आऊट करण्याची संधी होती. पण ती संधी शमीनंच गमावली. एल्गारच्या बॅटला लागलेला बॉल थेट शमीच्या दिशेनंच आला होता. पण, तो कॅच शमीला पकडता आला नाही.

शमीनं एल्गारला जीवदान दिले तेव्हा तो 63 रनवर होता. या जीवदानानंतर एल्गार आणि बावुमानं वेगानं रन जमवणे सुरू केले. हे जीवदान टीम इंडियाला महाग पडणार असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाच्या मदतीला आला. त्याने एल्गारला 77 रनवर LBW आऊट करत टीम इंडियाला पाचव्या दिवशी पहिलं यश मिळवून दिलं.

सेंच्युरियनचे पिच हा दक्षिण आफ्रिकेचा गड मानले जाते. या पिचववर आजवर फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या विदेशी टीमनी टेस्ट मॅच जिंकली आहे. या पिचवर पाकिस्ताननं 3, श्रीलंकेनं 5 आणि बांगलादेशनं 1 मॅच खेळली आहे, या सर्व टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सेंच्युरियनवर टेस्ट जिंकण्याची पहिली आशियाई टीम होण्याची टीम इंडियाला संधी आहे.

वाचा : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचचे Live Update 

First published:

Tags: Jasprit bumrah, South africa, Team india