• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • ....तर हार्दिक पांड्याला टीम इंडियात No Entry ! निवड समितीनं घेतला मोठा निर्णय

....तर हार्दिक पांड्याला टीम इंडियात No Entry ! निवड समितीनं घेतला मोठा निर्णय

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं आव्हान सुपर 12 मध्ये संपुष्टात येण्याचं एक महत्त्वाचं कारण हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस (Hardik Pandya Injury) होतं.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं आव्हान सुपर 12 मध्ये संपुष्टात येण्याचं एक महत्त्वाचं कारण हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस (Hardik Pandya Injury) होतं. हार्दिक संपूर्ण फिट नसतानाही त्याला सर्व मॅचमध्ये खेळवण्यात आलं. त्यामुळे टीम इंडियाला फटका बसला. या सर्व प्रकाराची निवड समिती आणि बीसीसीआयनं गंभीर दखल घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 टीममध्ये त्याचा समावेश न करून निवड समितीनं हार्दिकला इशारा दिला आहे. तसंच त्याच्या टीममधील पुनरागमनाची वाट सोपी नसल्याचा इशारा दिसा आहे. निवड समितीच्या एका सदस्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर 'इनसाईड स्पोर्ट्स' ला सांगितले की. 'हार्दिक पांड्याला टीममधून वगळण्यात आलं आहे. त्याला पुनरागमन करायचं असेल तर आधी स्वत:चा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. त्याला फक्त बॅटर म्हणून टीममध्ये जागा मिळणार नाही. पांड्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सूचना करण्यात येईल. त्या स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतरच  त्याला टीम इंडियात जागा मिळेल.' व्यंकटेश अय्यरला मिळाली संधी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे. व्यंकटेश अय्यरने हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जागा घेतली आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये व्यंकटेश अय्यरने केकेआरला (KKR) आयपीएल फायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका निभावली. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये केकेआरकडून खेळताना 10 मॅचमध्ये 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याची ऑल राऊंड कामगिरी सुरू आहे. त्यानं 5 मॅचमध्ये 155 रन केले असून 5 विकेट्स मिळवल्या आहेत. करारा जवाब मिलेगा! शोएब अख्तरनं दिली PTV ला धमकी, लष्कराचीही दाखवली भीती BCCI नं मागवला अहवाल टी20 वर्ल्ड कपच्या दरम्यान हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस टीम मॅनेजमेंटसाठी डोकेदुखी बनली आहे. बॉलिंग आणि बॅटींग दोन्हीतही पांड्या फार कमाल करू शकला नाही. त्यानं संपूर्ण स्पर्धेत फक्त 4 ओव्हर्स फेकल्या. तसंच 5 मॅचमध्ये त्यानं 69 रन काढले. फॉर्म आणि फिटनेसशी झगडणाऱ्या हार्दिक पांड्याबाबत निवड समितीनं अहवाल मागवला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: