• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • IND vs NZ: जयपूरच्या मॅचमध्ये कोरोना नियमांची ऐशीतैशी, प्रेक्षक विसरले मास्कचे बंधन आणि गाईडलाईन्सची काळजी

IND vs NZ: जयपूरच्या मॅचमध्ये कोरोना नियमांची ऐशीतैशी, प्रेक्षक विसरले मास्कचे बंधन आणि गाईडलाईन्सची काळजी

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टी20 मॅच बुधवारी झाली. देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती

 • Share this:
  जयपूर, 18 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड  (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टी20 मॅच बुधवारी झाली. देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती. या मॅचमध्ये कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. या मॅचसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या मर्यादीत करण्यात आलेली नव्हती. मात्र उपस्थित प्रेक्षकांचे लसीकरण किंवा आरटी-पीसीआर परिक्षण अनिवार्य करण्यात आले होते. न्यूज एजन्सी 'पीटीआय' नं दिलेल्या वृत्तानुसार जयपूरमध्ये आठ वर्षांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅचबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. मात्र यापैकी अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांनी मास्क लावला नव्हता. मॅच पाहण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक व्हीआयपी उपस्थित होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरही मास्क नव्हता. राजस्थान क्रिकेट असोसिएशनं मॅचच्या तिकीटावर मास्क घालणे अनिवार्य असल्याची सूचना केली होती. त्यानंतरही स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सामान्य प्रेक्षकांपासून ते व्हीआयपीपर्यंत अनेकांनी मास्क घातला नव्हता. कोरोना महामारीनंतर भारतामध्ये पहिल्यांदाच क्रिकेट मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या मर्यादीत करण्यात आली नव्हती. यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये स्टेडियमच्या एकूण क्षमतेपैकी 50 टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या केस वाढल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिका प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये पार पडली. IND vs NZ: द्रविड सरांच्या कोचिंगचं अश्विननं केलं वर्णन, म्हणाला... विजयाचं गिफ्ट मिळालं क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या फॅन्सना टीम इंडियानं विजयाचं गिफ्ट दिलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand) 5 विकेट आणि 2 बॉल राखून विजय झाला. न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 19.4 ओव्हरमध्येच पार केलं. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 62 रन, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 48 रन आणि ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 17 रनच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्याआधी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं
  Published by:News18 Desk
  First published: