मुंबई, 19 मार्च: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या आक्रमक खेळामुळे चौथ्या टी20 मॅचमध्ये भारतानं विजय मिळवला आहे. वादग्रस्त पद्धतीनं आऊट होण्यापूर्वी सूर्यकुमारनं 31 बॉलमध्ये 57 रन काढले होते. यामध्ये सहा फोर आणि तीन सिक्सचा समावेश आहे. सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स मारून एन्ट्री केली. सध्या प्रत्येक जण त्याच्या खेळीची प्रशंसा करत आहे. भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) देखील या बॅटींगमुळे प्रभावित झाला आहे. यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप टीममध्ये त्याची जागा पक्की आहे, असं मत युवराजनं व्यक्त केलं आहे.
युवराजनं ट्विट करत आनंद व्यक्त केला, 'सूर्यकुमारसाठी मी खूप खूश आहे. तो आयपीएल मॅच खेळतोय याच थाटात बॅटींग करत आहे. माझ्या वर्ल्ड कप टीममध्ये त्याची जागा पक्की.' सूर्यकुमारनं 50 रन करताच इराफान पठाण, हरभजन सिंग, वासिम जाफर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यासारख्या दिग्गजांनी त्याचं अभिनंदन केले आहे.
लक्ष्मणने ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, 'निर्भिड, कल्पक, आक्रमक सूर्यकुमारची बॅटींग पाहून खूप मजा आली. ही अतिशय चांगली गुणवत्तापूर्ण खेळी होती. ही अर्धशतकांची सुरुवात असेल, अशी आशा आहे.'
(IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्मानं एक निर्णय घेतला आणि विराट कोहली पाहत राहिला! )
वादग्रस्त आऊट
या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आलं. सॅम करनच्या बॉलिंगवर यादवने स्कूप मारण्याचा प्रयत्न केला, पण डेव्हिड मलानने उडी मारून कॅच पकडला, पण हा कॅच पकडताना बॉलचा मैदानाला स्पर्श झाला का नाही, हे स्पष्ट कळत नव्हतं, पण थर्ड अंपायरने सूर्याला आऊट दिलं, कारण मैदानातल्या अंपायरने सॉफ्ट सिग्नल आऊट दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Social media viral, Suryakumar yadav, Tweet, Twitter, Yuvraj singh