मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IND vs ENG: टीम इंडियासाठी Good News, 'हा' खेळाडू झाला फिट!

IND vs ENG: टीम इंडियासाठी Good News, 'हा' खेळाडू झाला फिट!

चौथ्या टेस्टमध्ये विराट या खेळाडूला बाहेर करणार?

चौथ्या टेस्टमध्ये विराट या खेळाडूला बाहेर करणार?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series) टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. लॉर्ड्स टेस्टमधील विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय टीमसाठी आणखी एक चांगली बातमी (Good News) आहे.

हेंडिग्ले, 24 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series) टीम इंडिया सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. लॉर्ड्स टेस्टमधील विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय टीमसाठी आणखी एक चांगली बातमी (Good News) आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आता फिट झाला असून निवडीसाठी उपलब्ध आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं ही माहिती दिली आहे.

अजिंक्यनं यावेळी सांगितलं की, 'शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. आम्हाला आता पुरेसा ब्रेक मिळाला आहे.  भारतीय बॉलर्समध्ये निवडीसाठी स्पर्धा आहे. सर्व फास्ट बॉलर्स खेळण्यासाठी सज्ज असून हा चांगला संकेत आहे.'

शार्दुल कुणाची जागा घेणार?

शार्दुल ठाकूरला त्याच्या बॅटींगमधील कौशल्यामुळे नॉटिंघम टेस्टमध्ये संधी देण्यात आली होती. तो नॉटिंघममध्ये शून्यावर आऊट झाला असला तरी त्यानं 4 विकेट्स घेत उपयुक्त बॉलिंग केली होती. या टेस्टनंतर त्याच्या स्नायूला दुखापत झाली. त्यामुळे तो लॉर्डस टेस्ट खेळू शकला नव्हता. शार्दुलच्या जागी अनुभवी इशांत शर्माचा (Ishant Sharma) टीममध्ये समावेश करण्यात आला होता.

इशांत शर्मानं लॉर्डस टेस्टमध्ये चांगली बॉलिंग करत आपली निवड योग्य ठरवली होती. त्यामुळे आता हेडिंग्ले टेस्टमध्ये टीम मॅनेजमेंट इशांतलाच कायम ठेवते की शार्दुलला पुन्हा संधी देते याची उत्सुकता आहे.

IND vs ENG: अजिंक्य रहाणेनं दिलं टिकाकारांना उत्तर, म्हणाला...

हेडिंग्लेमध्ये टीम इंडियाने एकूण 6 टेस्ट खेळल्या आहेत. यातल्या 2 टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि एक मॅच ड्रॉ झाली. टीम इंडियाने या मैदानात मागच्या दोन्ही टेस्ट जिंकल्या. तसंच 1967 नंतर एकही टेस्ट गमावली नाही. 1986 साली झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 279 रनने पराभव केला होता, तर 2002 साली टीम इंडियाचा इनिंग आणि 46 रनने विजय झाला.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Shardul Thakur