मुंबई, 12 जुलै : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली वन-डे आता काही तासांवर आलीय. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये खेळणे अनिश्चित आहे. विराटला दुखापत झाल्याची माहिती असून त्यामुळे आगामी दोन सामन्यांचा विचार करून टीम मॅनेजमेंट त्याला विश्रांती देऊ शकते. विराटच्या विश्रांतीची चर्चा सुरू असतानाच एक नवा व्हिडीओ समोर आल्यानं वाद निर्माण झाला आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोमवारचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. काही फॅन्स देखील विराटच्या भोवती आहेत. या व्हिडीओमध्ये विराट जखमी असल्याचं दिसत नाही, अशी भावना फॅन्स व्यक्त करत आहेत. त्यामुळे विराट खरंच दुखापतग्रस्त आहे का? विराटला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय तर तो लंडनच्या रस्त्यावर का फिरतोय? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Dosent look even a bit injured..
— S.Vaibhav (@SaiVaib41131476) July 12, 2022
विराट कोहली सध्या बॅडपॅचमधून जात आहे. त्यानं गेल्या अडीच वर्षात एकही शतक झळकावलेलं नाही. आता तो अर्धशतकासाठी देखील झगडत आहे. एजबस्टनमध्ये झालेल्या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये विराट फ्लॉप ठरला. तसंच इंग्लंड विरूद्धच्या दोन्ही टी20 सामन्यातही तो मोठी खेळी करू शकला नाही.
विराटला मागील मॅचच्या दरम्यान दुखापत झाली होती, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली होती. ही दुखापत बॅटींग की फिल्डिंग करताना झाली हे त्यांनी सांगितले नव्हते. तो दुखापतीमुळे नॉटिंघमहून लंडनला जाणार नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी विराटचा नवा व्हिडीओ समोर आल्यानं विराट आणि बीसीसीआयमध्ये नेमकं काय सुरूय हा प्रश्न उपस्थित झालाय.
IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी
विराट आणि बीसीसीआय यांच्यात मागील वर्षी देखील चांगलाच वाद झाला होता. विराटनं टी20 आणि वन-डे टीमची कॅप्टनसी सोडताना तो आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील मतभेद जगासमोर आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Viral video., Virat kohli